NEWS

आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी पोलिसांसमवेत केली औंध परिसराची पाहणी

Share Post

औंधमध्ये अलीकडेच झालेल्या दुःखद हल्ल्याचा पाठपुरावा म्हणून, तसेच रहिवाशांच्या सुरक्षिततेबाबत दिलासा देण्यासाठी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी आज औंध परिसराची पाहणी केली.आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी पोलिसांसमवेत केली औंध परिसराची पाहणी

आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी पोलिसांसमवेत केली औंध परिसराची पाहणी
आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी पोलिसांसमवेत केली औंध परिसराची पाहणी

पोलीस निरीक्षक आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांसह, औंधमधील परिहार चौक, डीपी रोड, नागरस रोड आणि आजूबाजूच्या परिसराची पायी फिरून पाहणी करण्यात आली. स्थानिक रहिवासी, पायी फेरफटका मारणारे व जॉगर्स यांच्यासमवेत गैरकृत्य चालणाऱ्या आणि धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांची पाहणी देखील केली असल्याचे आमदार शिरोळे यांनी सांगितले.

या परिसरातील गैरकृत्य चालणाऱ्या आणि धोकादायक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जागांच्या जवळ पोलिस बंदोबस्त आणि सुरक्षा उपाय वाढविण्यास सांगितले आहे. नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता पोलिसांनी देखील योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याची माहिती आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी दिली.

आमदार सिद्धार्थ शिरोळेंनी पोलिसांसमवेत केली औंध परिसराची पाहणी