MIT-WPUत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी
“राजकीय लोकशाही ही स्थिर व्हावी याचसाठी आर्थिक आणि सामाजिक लोकशाही प्रस्थापित झाली पाहिजे. असे झाले नाही तर विषमतेने ग्रासलेले लोक राजकीय लोकशाहीचे सौरचना उध्वस्त करतील. असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान सभेतील शेवटच्या भाषणात दिला होता. त्याकडे आजवर्त्यांच्या राजकर्त्यांनी दुर्लक्ष केले आहे.” असे मत ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरूण खोरे यांनी व्यक्त केले. MIT-WPUत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी
प्रबुद्धनायक महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वीं जयंती एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीच्या वतीने साजरी केली. या प्रसंगी पुण्याचे माजी महापौर शांतीलाल सुरतवाला हे सन्माननीय पाहुणे म्हणून उपस्थित होते. एमआयटी डब्ल्यूपीयूचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड हे अध्यक्षस्थानी होते.
या प्रसंगी एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम.चिटणीस, कुलसचिव गणेश पोकळे, सल्लागार डॉ. संजय उपाध्ये, नागपूर विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. एस.एम.पठाण, डॉ. प्रियंकर उपाध्याय, प्रा.डॉ. दत्ता दंगडे, विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर अध्यासनाचे प्रमुख प्रा. विनोद जाधव उपस्थित होते.
अरूण खोरे म्हणाले, “महात्मा गांधी, पं.नेहरू आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना हा देश धर्मराष्ट्र व्हावा असे वाटत नव्हते. पण ही भूमिका आता बदलली असून विद्यमान राज्यकर्ते आणि त्यांचे प्रमुख हे देवधर्म करण्यात गुंतलेले आहे असे चित्र स्पष्ट पणे दिसून येते. १८ व्या लोकसभेच्या निवडणूकीत देशातील सूजाण मतदात्यांनी हे वळण रोकण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे.”
डॉ.विश्वनाथ कराड म्हणाले, ” जगात भारताची ओळख ही महात्मा गांधी,भगवान गौतम बुद्ध आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आहे. त्यामुळे डॉ. आंबेडकर यांचे पंचशील जीवनात उतरावे. महात्मा फुले, डॉ. आंबेडकर यांनी खूप मोठे सामाजिक परिवर्तन आणले आहे. त्यांनी दाखविलेल्या मार्गावर सर्वांना चालनाचे आवाहन केले.
शांतीलाल सुरतवाला म्हणाले, ” प्रत्येकाने आपल्या घरातील पाल्यांना व येणार्या नव पिढीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे चरित्र वाचण्यास दयावे. तरच देशाचे भले होईल. वर्तमान काळात मोठी माणसे केवळ फोटतच आहेत. आता त्यांच्या विचारांवर आम्हाला चालावे लागणार आहे. ”
डॉ. आर.एम.चिटणीस म्हणाले,”डॉ. आंबेडकर यांनी ३२ विषयांमध्ये पदव्या घेतल्या होत्या. ९ भाषा अवगत असणारे डॉ. बाबासाहेब यांन अर्थशास्त्रामध्ये अद्वितीय कार्य केले आहे. त्यांच्या मानव कार्याचा आलेख पाहता २० देशांमध्ये त्यांचे पुतळे उभारण्यात आले आहेत.”
याप्रसंगी डॉ. एस.एन.पठाण, डॉ. संजय उपाध्ये, प्रा.डॉ. दत्ता दांडगे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिक्षा, संघटीत व्हा आणि संघर्ष करा हा संदेश मानवजातीला दिला. तसेच त्यांनी आयुष्य भर जनतेसाठी केलेल्या कार्याला उजाळा दिला.
राजकीय स्थिरतेसाठी सामाजिक व आर्थिक लोकशाही आवश्यक
ज्येष्ठ साहित्यिक व पत्रकार अरूण खोरे यांचे विचार