23/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

'एमआयटी एडीटी'च्या 'कारी' महोत्सवास प्रारंभ

'एमआयटी एडीटी'च्या 'कारी' महोत्सवास प्रारंभ

‘एमआयटी एडीटी’च्या ‘कारी’ महोत्सवास प्रारंभ

Share Post

 एमआयटी आर्ट, डिजाईन व टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणेच्या ललित कला, परफॉर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिझाइन आणि आर्किटेक्चरचा सर्वांत मोठा महोत्सव असणाऱ्या “कारी-२०२४” ला घोले रोड, शिवाजीनगर येथील राजा रविवर्मा आर्ट गॅलरी येथे मंगळवारी प्रारंभ झाला. 

”कारी” म्हणजे ‘कलाकृती’, आणि चार दिवस चालणाऱ्या कला महोत्सवाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी साकारलेल्या अप्रतिम कलाकृती सर्वांना पाहण्यासाठी खुल्या असणार आहेत. विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कलाकृती लोकांपर्यंत पोचव्यात यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनाचे उद्घाटन प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते तर प्रसिद्ध वास्तुविशारद ऋषीकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांच्या प्रमुख उपस्थिती, विद्यार्थ्यांनी साकारलेल्या राममंदीर प्रतिकृतीचे पूजन व दीपप्रज्वलन द्वारे पार पडले. याप्रसंगी, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे प्र.कुलगुरू डाॅ.अनंत चक्रदेव, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, डाॅ.मिलिंद ढोबळे, डाॅ.अश्विनी पेठे,डाॅ.नचिकेत ठाकूर, डाॅ.आनंद बेल्हे, डाॅ.विरेंद्र शेटे, प्रा.प्रसाद निकुंभ, डाॅ.तुषार पंके आदी उपस्थित होते. 

'एमआयटी एडीटी'च्या 'कारी' महोत्सवास प्रारंभ
‘एमआयटी एडीटी’च्या ‘कारी’ महोत्सवास प्रारंभ

उद्घाटनाप्रसंगी बोलताना, चंद्रमोहन कुलकर्णी म्हणाले की, कित्येक दिवसांपासून माझी ललित कला, परफाॅर्मिंग आर्ट्स, मीडिया, डिजाइन आणि आर्किटेक्चर या सर्व गोष्टी एकाच छताखाली पाहण्याची इच्छा होती, ती आज ‘कारी’च्या माध्यमातून पूर्ण होत आहे. खरंतर कला ही कुठल्याही व्यक्तिच्या जीवनातील अतिशय महत्त्वाचा असा भाग असते. कला ही मानसाला आनंदाने जीवन जगण्याची प्रेरणा देत असते. त्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या कलेला वाव देत, कलाभिमूख शिक्षणाकडे ‘एमआयटी एडीटी’चा असणारा भर नक्कीच उल्लेखनीय आहे, असेही त्यांनी म्हटले. 
या प्रसंगी बोलताना ऋषीकेश कुलकर्णी व गिरीश दोशी यांनी देखील विद्यार्थ्यांनी साकारलेल्या कलाअविष्कारांचे भरभरून कौतुक करताना, पुणे शहरातील रसिकांनी याचा लाभा घ्यावा असे आवाहन केले. तीन दिवस चालणाऱ्या ‘कारी’ या कला उत्सवाची सांगता शनिवार दि.२०/४/२०२४ रोजी होणार असून, तत्पूर्वी, पुणे शहरातील नागरिकांनी आपल्या कुटुंबासह या प्रदर्शनाला नक्की भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

'एमआयटी एडीटी'च्या 'कारी' महोत्सवास प्रारंभ
‘एमआयटी एडीटी’च्या ‘कारी’ महोत्सवास प्रारंभ