Daily UpdateNEWS

MDIndia Healthcare Services TPA Pvt Ltd. कार्यालयाचे लवकरच पटना येथे उद्घाटन

Share Post

आरोग्य विमा उद्योगातील अग्रगण्य कंपनी एमडीइंडिया हेल्थ इंश्योरेंस टीपीए प्राइवेट लिमिटेड आपल्या सेवा नेटवर्कला वाढविण्यासाठी एक धोरणात्मक पाऊल उचलून पटना येथे आपल्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन करण्यास उत्सुक आहे. आणि या ऑगस्ट महिन्यात आणखी दोन महत्वाच्या ठिकाणी एमडीइंडिया हेल्थ च्या नवीन कार्यालयांचे उद्घाटन करणार आहे. या विस्तारामुळे भारतभरात उत्तम आरोग्य विमा सेवा पुरविण्याच्या एमडीइंडिया हेल्थ च्या वचनपुर्तीला बळ मिळेल.MDIndia Healthcare Services TPA Pvt Ltd. कार्यालयाचे लवकरच पटना येथे उद्घाटन

पटना येथील भव्य उद्घाटन सोहळा खालील मान्यवरांच्या हस्ते होणार आहे: – ओरिएंटल इन्शुरन्स- RO- CRM: श्री. मनोज कुमार – नॅशनल इन्शुरन्स कंपनी- RO-CRM: श्री. अवधेश कुमार – युनायटेड इंडिया इन्शुरन्स कंपनी- RO-RM: श्री. तन्मय चक्रवर्ती – न्यू इंडिया एश्युरन्स- RO-DGM: श्री. हुकुम चंदह्या उद्घाटनामुळे एमडीइंडिया हेल्थ आपल्या कक्षा रुंदावण्यासाठी आणि सेवा वृद्धिगत करण्यासाठी सक्षम होईल. हे नवीन कार्यालय कंपनीच्या पायाभूत विस्ताराच्या व्यापक योजनेचा एक भाग आहे, ज्यामुळे अधिक समुदायांना दर्जेदार आरोग्य विमा सेवा आणि सहाय्यता मिळेल.या नवीन पटना कार्यालयानंतर, एमडीइंडिया ची भारतभरात १४४ कार्यालये कार्यरत होतील, ज्यात अतिदुर्गम भागातील कार्यालयेही समाविष्ट आहेत. हे विस्तृत नेटवर्क कंपनीला २५ कोटी भारतीय लोकांना सेवा देण्यासाठी सक्षम बनवते, ज्यामुळे आरोग्य विमा लाभार्थ्यांना उच्च-स्तरीय आणि वैयक्तिकरित्या TPA सेवा प्रदान केल्या जातात. MDIndia ची टीम्स सातत्याने, २४x७, आपल्या आरोग्य विमा लाभार्थ्यांना अखंडित सेवा आणि सहाय्यता देण्यासाठी कार्यरत आहेत.दोन दशकांहून अधिक काळापासून, एमडीइंडिया आरोग्य विमा क्षेत्रात एक महत्त्वाची भूमिका बजावत असून, शहरी आणि ग्रामीण भागात त्यांच्या गुणवत्तापूर्ण आणि विश्वासार्ह सेवा आणि सहाय्यतेसाठी ओळखली जाते. कंपनीचा समुह (टीम्स) आरोग्य विमा दाव्यांचे आणि संबंधित सेवांचे व्यवस्थापन करण्यात कार्यक्षमता, कौशल्य, आणि दयाळूपणासाठी ओळखल्या जातात. विशेषतः गंभीर आरोग्य आपत्कालीन स्थितीत.एमडीइंडिया चा विस्तार सरकारी उपक्रमांच्या अनुषंगाने आहे, ज्याचे उद्दिष्ट विविध आरोग्य विमा योजनांद्वारे गरीब गटांना मदत करणे आहे. या नवीन कार्यालयांमुळे, एमडीइंडिया चे नेटवर्क विस्तृत व्याप्ती आणि सहाय्यता सुनिश्चित करेल, विशेषतः जेव्हा ग्राहक रुग्णालयात आजारांशी झुंज देत असतीलविस्ताराबद्दल आपली उत्सुकता व्यक्त करताना, एमडीइंडिया हेल्थ इंश्योरेंस टीपीए प्राइवेट लिमिटेड चे अध्यक्ष, श्री. रजनीश शर्मा म्हणाले, “आम्ही उत्कृष्ट सेवा आणि सहाय्यता प्रदान करण्यासाठी वचनबद्ध आहोत.

पटना येथील नवीन कार्यालय बिहारमधील आमच्या सेवांच्या कक्षा रूंदावण्यात मदत करेल. आणि पूर्व आणि दक्षिण भागात आणखी प्रभावी सेवा प्रदान करण्यासाठी आम्ही कार्यरत आहोत.”एमडीइंडिया हेल्थ इंश्योरेंस टीपीए प्राइवेट लिमिटेड चे व्यवस्थापकीय संचालक, श्री. समीर भोसले यांनी कंपनीच्या निष्ठेवर भर देऊन सांगितले, “आमची अविचल वचनबद्धता सीमारेषेवर उभ्या असलेल्या सैनिकांप्रमाणेच आहे. आम्ही सुरळीत आणि योग्य वैद्यकीय विमा दावा सेवा सुनिश्चित करण्यासाठी प्रयत्नशील आहोत, ज्यामुळे गरजूंना आवश्यक सुविधा मिळेल. आमचे ध्येय ग्राहकांच्या समाधानावर विशेष लक्ष केंद्रित करून भारतभरातील २५ कोटी लोकांच्या जीवनावर सकारात्मक प्रभाव पाडणे आहे.”हा विस्तार एमडीइंडिया साठी एक महत्वपूर्ण टप्पा आहे, ज्यामुळे त्यांच्या देशभरात अतुलनीय आरोग्य विमा सेवा आणि सुविधा पुरवण्याच्या मिशनला मजबूती मिळते.

MDIndia Healthcare Services TPA Pvt Ltd. कार्यालयाचे लवकरच पटना येथे उद्घाटन
MDIndia Healthcare Services TPA Pvt Ltd. कार्यालयाचे लवकरच पटना येथे उद्घाटन