कसब्यात महायुती एकवटली जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर
विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी अवघे नऊ दिवस उरले असून उमेदवारांकडून वेगवेगळ्या माध्यमातून प्रचाराचा धडाका लावण्यात आला आहे. कसबा विधानसभा मतदारसंघ भाजप महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांच्या प्रचारार्थ महायुतीचा विजयसंकल्प मेळावा नुकताच पार पडला. यावेळी जनतेच्या आशीर्वादाने यंदा रासने हे निश्चित विजयी होतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी व्यक्त केला आहे.कसब्यात महायुती एकवटली जनतेच्या आशीर्वादाने रासनेंचा विजय निश्चित – मानकर
नारायण पेठेतील गुप्ते मंगल कार्यालय येथे महायुतीचा मेळावा पार पडला. यावेळी बोलताना दीपक मानकर म्हणाले की, “हेमंत रासने हे अत्यंत शांत आणि संयमी असून त्यांनी गेल्या 18 महिन्यांमध्ये केलेलं काम कौतुकास्पद आहे. पराभव झाल्यानंतर अनेक जण खचून जातात मात्र त्यांनी दुप्पट गतीने नागरिकांची सेवा केली. त्यामुळे कसब्यातील जनता त्यांना नक्की आशीर्वाद देऊन विधानसभेत पाठवेल हा विश्वास आहे”.
भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे म्हणाले, “कसबा मतदारसंघात एकवटलेली महायुतीची ताकद बघितल्यानंतर हेमंत रासने हे विजयी होणार हे निश्चित झालं आहे. लोकसभेच्या मताधिक्यापेक्षा अधिकच मताधिक्य मिळेल. राज्यामध्ये लोककल्याणकारी महायुतीचे सरकार आणण्यासाठी जनता कसब्यातील आमदार विधानभवनात पाठवेल हा विश्वास आहे”.
यावेळी पदाधिकारी मेळाव्यास भाजप माजी राष्ट्रीय महामंत्री श्री. सी.टी. रवी, भाजप शहराध्यक्ष धीरज घाटे, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष श्री. दीपक मानकर, आरपीआयचे अध्यक्ष श्री.संजय सोनावणे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर, शिवसेना सहसंपर्क प्रमुख महिला आघाडी सुदर्शना त्रिगुनाईत, शिवसेना प्रदेश सचिव किरण साळी, राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे, युवा मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष श्री. कुणाल टिळक, आरपीआयचे मंदार जोशी, गौरव बापट यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.