देशात लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने प्रसिद्ध केलेले संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप असल्याचे मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष माधव भांडारी यांनी व्यक्त केले.भारतीय जनता पार्टीचे संकल्प पत्र विकसित भारताचा रोड मॅप – माधव भांडारी
शहराध्यक्ष धीरज घाटे, प्रदेश प्रवक्ते संदीप खर्डेकर, पश्चिम महाराष्ट्र माध्यम प्रमुख अमोल कविटकर, हेमंत लेले, पुष्कर तुळजापूरकर यांची उपस्थिती होती.
माधव भांडारी म्हणाले, ‘जनतेच्या आकांक्षांना आकार देणारे हे संकल्प पत्र आहे.दहा वर्षांतील पूर्वीच्या जाहीरनाम्यातील पूर्तता झालेल्या विकासकामे आणि योजनांचा आढावा या संकल्पपत्रात घेतला आहे. अशा प्रकारची भूमिका याआधी कोणत्याच राजकीय पक्षाने मांडली नाही. दरवेळी फक्त नवीन जाहीरनामा प्रसिद्ध केला.’
यावेळी माधव भांडारी म्हणाले, भारताला ‘२०४७ पर्यंत एक संपन्न, समर्थ राष्ट्र म्हणून उभे करण्याचा संकल्प केला आहे. युवक, महिला, शेतकरी अशा सर्व समाज घटकांचे जीवनमान उंचावण्यासाठी संकल्प पत्रात समावेश करण्यात आला आहे. रोजगार निर्मितीसाठी पायाभूत सुविधांवर भर देण्यात आला आहे.
समान नागरी कायदा लवकर लागू व्हावा ही भाजपची भूमिका आहे. जोपर्यंत हा कायदा येत नाही तोपर्यंत महिलांना समान हक्क मिळणार नाहीत असेही माधव भांडारी म्हणाले.

More Stories
बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन
Maestro Realtek excelled as Menlo Developer strategic partner for Codename Frontyard premium NA villa plotted project
The Rise of Pune: Factors Driving the Real Estate Boom