सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
शिक्षण प्रसारक मंडळीचे, सर परशुरामभाऊ महाविद्यालय पुणे आणि एन.सी.सी विभागाच्या वतीने कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रम प्रसंगी एन.सी.सी कॅडेसकडून जवानांना शस्त्र मानवंदना देण्यात आली.सर परशुरामभाऊ महाविद्यालयात कारगिल विजय दिवस उत्साहात साजरा
भारतीय सैन्य दलातील संधी, तंत्रज्ञान आणि भारतीय सेना याविषयी मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात आले.या कार्यक्रमास इतर महाविद्यालयातील कॅडेटस देखील आवर्जून उपस्थित होते.
यावेळी प्रमुख अतिथी म्हणून ब्रिगेडियर चौहान व कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डाॅ.सुनिल गायकवाड सर एअर मार्शल शशिकांत ओक, डाॅ. नितिन करमळकर उपस्थित होते.कार्यक्रम यशस्वी होण्यास शिक्षण प्रसारक मंडळींचे सर्व पदाधिकारी, 36महा.बटालियन सर्व स्टाफ,महाविद्यालय सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी इ.मार्गदर्शन लाभले.