20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच

Share Post

काय अपेक्षा आहेत आमच्या अशा त्यांच्याकडून… दिवसातून एकदा आमच्या खांद्यावरून हात फिरवून विचार ना.. आई कशी आहेस? बाबा कसे आहात? मन सुन्न करणारे हे वाक्य नकळत डोळ्यांच्या कडा पाणावणारे आहे.अनेकदा वयस्कर व्यक्तींना आऊटडेटेड, अडगळीतले सामान समजले जाते. परंतु याच सामानाची किंमत आणि ताकद काय आहे, हे सांगणारा चित्रपट येत्या २६ एप्रिल रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होत आहे. महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’ या सिनेमाचा ट्रेलर लाँच सोहळा पार पडला.महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच

सोहळ्याला रंगात आणण्यासाठी वैभव जोशी यांच्या ‘सोबतीचा करार’ संगीत मैफलचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये स्वप्नील बांदोडकर, केतकी माटेगावकर, पवनदीप राजन यांचाही सहभाग लाभला. यावेळी महेश मांजरेकर यांनी गायले गाणे ‘काय चुकले सांग ना?’ या काही गाण्याच्या ओळी गायल्या.

जुनं फर्निचर… या म्हाताऱ्याला अडवूनच दाखवा !” ट्रेलरवरूनच हा चित्रपट ज्येष्ठ नागरिकांच्या अस्तित्वावर भाष्य करणारा आहे, हे कळतेच. मुलांप्रती असलेल्या कर्तव्यांमध्ये आपण कमी पडणार याची चिंता आईवडिलांना नेहमीच असते. परंतु तीच चिंता, काळजी, जबाबदारी आई वडिलांच्या म्हातारपणात मुलं बजावतात? वृद्धापकाळात मुलांकडून चार प्रेमाचे शब्द ऐकण्याची त्यांना इच्छा असते.

ती इच्छाही ही पिढी पूर्ण करू शकत नसेल, तर आई वडिलांनी या वयात कोणाकडून प्रेमाची अपेक्षा ठेवावी, असा प्रश्न ट्रेलर पाहून प्रेक्षकांच्या मनात उद्भवतो. आपल्या पोटच्या मुलावरच आईच्या मृत्यूचा आरोप गोविंद पाठक यांने लावला असून आता याचा निकाल काय लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना चित्रपटातच मिळणार आहे.

सत्य- सई फिल्म्स आणि स्कायलिंक एन्टरटेनमेंट प्रस्तुत ‘जुनं फर्निचर’ चे यतिन जाधव निर्मित ‘जुनं फर्निचर’ची कथा, पटकथा, संवाद महेश वामन मांजरेकर यांनी लिहिले असून यात महेश मांजरेकर, मेधा मांजरेकर, भूषण प्रधान, अनुषा दांडेकर, समीर धर्माधिकरी, डॉ.गिरीश ओक, विजय निकम, संतोष मिजगर, अलका परब, शरद पोंक्षे यांच्याही मुख्य भूमिका या चित्रपटामध्ये आहेत.

सिनेमाबद्दल दिग्दर्शक महेश मांजरेकर म्हणाले, ‘’ जुनं फर्निचर… या नावातच चित्रपटाचा संदर्भ लागतो. अनेक घरांमध्ये हल्ली असे चित्र दिसतेय. बाहेरही अनेक ठिकाणी ज्येष्ठांना जुनं फर्निचर म्हणूनच संबोधले जातेय हे मी पाहिल आहे.यातूनच मला हा विषय सुचला. मी या चित्रपटाबद्दल एकच सांगेन ‘जुनं फर्निचर’ला कमी समजू नका. त्यांच्यात जी ताकद आहे, ती आताच्या तकलादू फर्निचरमध्ये अजिबात नाही. ही ताकद फक्त शारीरिकच नाही तर मानसिक आणि भावनिकदृष्ट्याही तितकीच खमकी आहे.

महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित 'जुनं फर्निचर'चा ट्रेलर लाँच
महेश वामन मांजरेकर दिग्दर्शित ‘जुनं फर्निचर’चा ट्रेलर लाँच

Juna Furniture | Trailer | Mahesh Manjrekar | Medha Manjrekar | Bhushan Pradhan | Anusha Dandekar