‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ मालिकेत झळकणार अभिषेक बजाज
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आगामी मालिकेत मोहक व्यक्तिमत्वाच्या अयान ग्रोव्हरच्या रूपात झळकणार अभिषेक बजाज
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनने अलीकडेच ‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ या आपल्या नवीन मालिकेची घोषणा केली आहे. ही एक रोमॅंटिक आणि उत्कट मालिका आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातल्या एका छोट्या शहरात राहणाऱ्या शिवांगी सावंत या साध्याशा मुलीची आणि अत्यंत लोकप्रिय असलेल्या अयान ग्रोव्हर या सुपरस्टारची कहाणी आहे.
सिनेमावरील आत्यंतिक प्रेमामुळे शिवांगीला आपल्या वडिलांच्या ‘संगम सिनेमा’ला भरभराटीचे दिवस पुन्हा मिळवून देण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी धडपड करण्याची प्रेरणा मिळते. अयान ग्रोव्हरचा एखादा सुपरहिट सिनेमा संगम सिनेमाचे नशीब पालटून टाकेल असा तिचा विश्वास आहे. या मालिकेत ग्लॅमर घेऊन येणार आहे अयान ग्रोव्हरच्या रूपात अभिनेता अभिषेक बजाज.
व्हिडिओ येथे बघा: https://www.instagram.com/reel/C7gzyhlvLcF/?igsh=MWpmMWlzemxxYXk5Yw%3D%3D
या मालिकेत काम करत असल्याचा उत्साह व्यक्त करत अभिषेक बजाज म्हणाला, “अयान ग्रोव्हर ही व्यक्तिरेखा पडद्यावर जिवंत करण्यास मी आतुर आहे. आपल्या मोहक व्यक्तिमत्वाच्या बळावर लोकप्रिय झालेला हा सुपरस्टार प्रत्यक्षात मात्र आपल्या मनातल्या असुरक्षिततेशी लढा देत आहे आणि कौटुंबिक ओझे आपल्या मनावर बाळगून आहे. त्याची गोष्ट विलक्षण आहे आणि प्रेक्षकांसमोर त्याची कहाणी कधी येते, असे मला झाले आहे. मला आशा आहे की, प्रेक्षकांना अयान आणि त्याचा संघर्ष समजू शकेल. त्याची कहाणी जगासमोर मांडण्यासाठी मी उत्सुक आहे.”
‘ज्युबिली टॉकीज – शोहरत. शिद्दत. मोहब्बत’ लवकरच येत आहे, सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवर!