झिष्टाच्या ‘संमेलन’ प्रदर्शनाला पुण्यामध्ये सुरूवात; भारतातील पाककला व कलात्मक वारसाचे साजरीकरण
झिष्टा या आघाडीच्या हँडीक्राफ्टेड पारंपारिक किचनवेअर, डायनिंग वेअर आणि होम डेकोर ब्रँडला ३-दिवसीय प्रदर्शन ‘संमेलन’च्या शुभारंभाची घोषणा करताना आनंद होत आहे. हे प्रदर्शन भारतातील १५ राज्यांमधील ६५० कारागीरांनी हाताने तयार केलेल्या कलाकृतींच्या संपन्न आणि वैविध्यपूर्ण वारसाला साजरे करते. हे प्रदर्शन सोनल हॉल, कर्वे रोड, पुणे येथे २७ ते २९ सप्टेंबर २०२४ पर्यंत सकाळी १० ते रात्री ८ वाजेपर्यंत आयोजित करण्यात आले आहे.झिष्टाच्या ‘संमेलन’ प्रदर्शनाला पुण्यामध्ये सुरूवात; भारतातील पाककला व कलात्मक वारसाचे साजरीकरण
हे अद्वितीय प्रदर्शन पुणेकरांना झिष्टाच्या हस्तनिर्मित उत्पादनांच्या परिपूर्ण श्रेणीला एक्स्प्लोअर करण्याची संधी देते, ज्यामध्ये कास्ट आयर्न, सोपस्टोन, पितळ आणि मणिपूर काळ्या भांड्यांपासून बनवण्यात आलेल्या पारंपारिक कूकवेअरचा समावेश आहे. संपन्न पाककला परंपरांसाठी ओळखले जाणारे पुणे शहर मिसळ पाव, पोहा, पुरणपोळी, भाकरी व आमटी यांसारख्या स्वादिष्ट पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. हे आवडते खाद्यपदार्थ तयार करण्यासोबत कढईसारखी भांडी मसालेदार मिसळ तयार करण्यासाठी यथायोग्य आहेत, तर तवा कुरकरीत भाकरी व रोटी बनवण्यासाठी उपयुक्त आहे. खुसखुशीत, चवदार डोसा व पॅनकेक्स बनवण्यासाठी ट्रॅडिशनल व कास्ट आयर्न रेज्ड एज पॅन वापरता येऊ शकतो.
तसेच, झिष्टाने नवरात्री गिफ्ट्स, आर्टिसनल लॅम्प्स, दिवे आणि इटिकोपाका, वाराणसी व चन्नापटना यांसारख्या प्रांतांमधील पारंपारिक खेळणींची स्पेशल श्रेणी डिझाइन केली आहे, जी घरगुती सजावट आणि सणासुदीच्या काळात गिफ्टिंगसाठी परिपूर्ण आहे. उत्पादनाच्या प्रदर्शनाव्यतिरिक्त ‘संमेलन’ परस्परसंवादी व माहितीपूर्ण अनुभव म्हणून डिझाइन करण्यात आले आहे, जेथे अभ्यागत वैयक्तिकृत प्रात्यक्षिकांचा आनंद घेऊ शकतात आणि महाराष्ट्रीयन पाककलांमध्ये पारंपारिक कूकवेअरचा समावेश करण्याच्या पद्धतींबाबत जाणून घेऊ शकतात.
झिष्टा पुणे प्रदर्शनामध्ये सर्व्हवेअर व कूकवेअरची विशेष कान्सा तुलसी श्रेणी देखील लाँच करण्यात आली आहे, ज्यामध्ये पंरपरा व टिकाऊपणाचे अद्वितीय संयोजन आहे आणि दैनंदिन वापर व उत्सवी साजरीकरणासाठी परिपूर्ण आहे.
या प्रदर्शनाचे खास आकर्षण आहे लाइव्ह कल्हई वर्कशॉप, जेथे अभ्यागत कल्हई (पितळेच्या भांड्यांना टिन-कोटिंग)ची पारंपारिक कला पाहण्यासाठी नोंदणी करू शकतात. अभ्यागत त्यांची वंशपरंपरागत पितळेची भांडी देखील आणू शकतात आणि साइटवर त्यांना कल्हई करू शकतात.
झिष्टाच्या सह-संस्थापक व संचालक आर्चिस माथे माधवन आपला आनंद व्यक्त करत म्हणाल्या, ”आम्हाला परंपरा व कारागिरीला महत्त्व देणारे शहर पुण्यामध्ये ‘संमेलन’ प्रदर्शन आयोजित करण्याचा आनंद होत आहे. हे प्रदर्शन व्यक्तींना भारतातील संपन्न सांस्कृतिक वारसा आणि त्याचे जतन करणाऱ्या कारागिरांशी कनेक्ट होण्याचा अद्वितीय मार्ग देते.”