‘इंद्रायणी’भेटीला कलर्स मराठीवर
लवकरच सर्वांची लाडकी इंदू म्हणजेच ‘इंद्रायणी’ आपल्या भेटीला येणार आहे. कलर्स मराठीवर प्रदर्शित होणाऱ्या ‘इंद्रायणी’ या मालिकेची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात आहेत. तत्पूर्वी ‘इंद्रायणी’ मालिकेच्या संपूर्ण टीमने पुण्यातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराला भेट दिली आणि आरती केली. या कार्यक्रमात प्रत्येक व्यक्तिरेखेची ओळखही करून देण्यात आली. ‘
इंदू’ कोण आहे, तिचे आई वडील कोण आहेत, तिचे जग कसे आहे, हे जाणून घेण्यासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक आहेत. या सगळ्यांची उत्तरे देण्यासाठी एका पत्रकार परिषदेचे आयोजनही यावेळी करण्यात आले. यावेळी ‘इंदू’ची भूमिका साकारणारी सांची भोईर, अनिता दाते, संदीप पाठक स्वानंद बर्वे, आयुष उलगड्डे, राघव घाडगे यांच्यासह दिग्दर्शक विनोद लव्हेकर उपस्थित होते. दिग्दर्शक आणि कलावंतांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला.indrayani colors marathi serial
More Stories
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील ज्युबिली टॉकीज शोहरत.शिद्दत.मोहब्बत
पोकेमॉनची नवी सीरिजचं प्रीमिअर हंगामा वर 25 मे रोजी प्रसारित होणार
‘श्रीमद् रामायण’ मालिकेतील सुंदरकांड अध्यायात सीतेचा शोध