जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसच्या जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न
जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या जाधवर विधी महाविद्यालय आणि अॅड. शार्दुलराव सुधाकरराव जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संस्थेच्या नऱ्हे शैक्षणिक संकुलात करण्यात आले होते. यावेळी अॅड. डॉ. राजेंद्र अनभुले आणि अॅड. विपुल दुशिंग यांचा विशेष सन्मान करण्यात आला. पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेचे आयोजन देखील यावेळी करण्यात आले होते. यावेळी न्यायमूर्ती रामेश्वर जटाले, संस्थेचे अध्यक्ष प्राचारी डाॅ. सुधाकर जाधवर, उपाध्यक्ष अॅड.शार्दुल जाधवर, अॅड. शीतल पोटले यावेळी उपस्थित होते.जाधवर ग्रुप ऑफ इन्स्टिटयूटसच्या जाधवर विधी महाविद्यालयाचे उद्घाटन संपन्न
न्यायमूर्ती रामेश्वर जटाले म्हणाले, यश मिळवायचे असेल तर खूप मेहनत करावे लागे. मेहनतीला कोणताही पर्याय नाही आणि ती मेहनत निरंतर असली पाहिजे. तुमच्या बुद्धीला प्रशिक्षण द्या. कायम वाचत रहा आणि ताणतणावापासून दूर राहण्यासाठी प्रयत्न करा, असेही त्यांनी सांगितले.

अॅड. डॉ. राजेंद्र अनभुले म्हणाले, मूट कोर्ट हे अतिशय महत्व आहे. प्रत्यक्ष वकिली शिकण्याची संधी यातून मिळते. सगळ्या गोष्टींना छेद देऊन सांघिक काम यामाध्यमातून केले जाते. मूट कोर्ट स्पर्धा प्रामुख्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्याचा दृष्टीकोन नकारात्मक आहे. मराठी मुलांनी भाषेचा अडसर न ठेवता स्पर्धेत सहभागी व्हावे तसेच महाराष्ट्रातील मुलांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या स्पर्धांमध्ये सहभागी व्हावे या स्पर्धा विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाच्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.
अॅड.विपुल दुशिंग म्हणाले, मूट कोर्ट स्पर्धेमुळे तर्कशुद्ध विचार करण्याची प्रक्रिया होते. वकिली करताना मूट कोर्ट चा उपयोग होतो. ज्यावेळी विनाकारण अन्याय होत असेल आणि त्यांना योग्य वेळी वकिलांची मदत मिळाली पाहिजे. कोणतीही केस आपल्याला हाताळायला मिळाल्या नंतर केस संपल्यावर आपल्याला समाधान मिळाले पाहिजे हेच तुमचे यश आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
अॅड.शार्दुल जाधवर म्हणाले, चांगल्या दर्जाचे शिक्षण देणारे विधी महाविद्यालय जाधवर ग्रुप आॅफ इन्स्टिटयूटस्च्या वतीने स्थापन करण्यात आले आहे. समाजातील सर्व स्तरातील विद्यार्थांना चांगल्या दर्जाचे विधी शिक्षण मिळावे यासाठी महाविद्यालायाच्या माध्यमातून आम्ही प्रयत्नशील आहोत. इंग्रजी सोबतच मराठी माध्यमातील मूट कोर्ट स्पर्धा पुढील वर्षापासून आम्ही घेणार आहोत. या स्पर्धेचे रोख पारितोषिक देखील इंग्रजीपेक्षा अधिक असेल , जेणेकरुन ग्रामीण भागातील विद्यार्थीदेखील स्पर्धेत मोठ्या संख्येने सहभागी होतील.
विजेत्याला रुपये ३५ हजार आणि चषक, उपविजेत्याला रुपये २० हजार आणि चषक, बेस्ट मेमोरियल पुरस्कार रुपये १५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर रुपये १० हजार आणि चषक, बेस्ट रिसर्चर रुपये ५ हजार आणि चषक, बेस्ट स्पीकर(प्रिलिम्स) रुपये ५ हजार आणि चषक प्रदान करण्यात आला. प्राचार्य डॉ. सुधाकर जाधवर यांनी आभार मानले.
- पहिल्या राष्ट्रीय जाधवर मूट कोर्ट स्पर्धेचे विजेते
मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालयाचे अक्षय हांडे, साहिल वनसूत्रे आणि रोमहर्ष शेळके हे विजेते ठरले. तर डॉ. पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालय अमरावतीचे अक्सा मिर्झा, सदिच्छा कांबळे, प्रथमेश थोरात यांनी उपविजेतेपद पटकाविले. विधी लुणावत (यशवंतराव चव्हाण विधी महाविद्यालय) ही बेस्ट रिसर्चर तर प्रिलिमनरी राऊंड बेस्ट स्पीकर सत्यजित पवार (डीईएस नवलमल फिरोदिया लॉ कॉलेज) आणि अंतिम फेरीचा बेस्ट स्पीकर साहिल वनसूत्रे (मराठवाडा मित्र मंडळ शंकरराव चव्हाण विधी महाविद्यालय) ठरला. बेस्ट मेमोरियल डॉ. डी.वाय.पाटील विधी महाविद्यालयाचे सेजल गोटाफोडे, सौम्या चांडक, सान्या कुमारी ठरले.
