आविर्भाव एस.आणि अथर्व बक्षी यांनी सुपरस्टार सिंगर 3 चा खिताब जिंकला
सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरील सुपरस्टार सिंगर 3 या लहान मुलांच्या गायन रियालिटीमध्ये गेल्या 5
महिन्यांपासून आपल्या हृदयस्पर्शी संगीताने, लोभस गोडव्याने आणि सुमधुर आवाजाने प्रेक्षकांचे भरपूर
मनोरंजन करून त्यांच्या मनात स्थान मिळवणाऱ्या गान-वीरांच्या संगीत प्रवासाची एका सुरेल सोहळ्याने
सांगता झाली आहे.आविर्भाव एस.आणि अथर्व बक्षी यांनी सुपरस्टार सिंगर 3 चा खिताब जिंकला
‘संगीत के नए हुनर जो बनेंगे कल के धरोहर’ असा शोध घेताना या मंचाने भारतीय
संगीताची परंपरा केवळ जतन केली नाही तर हा सांस्कृतिक वारसा आणखी समृद्ध केला. या तारांकित
सोहळ्याचे थीम होते, ‘फ्यूचर का फिनाले’. प्रेक्षकांच्या प्रतिक्षेचा अंत सुखद झाला, कारण झारखंडचा अथर्व
बक्षी आणि केरळचा आविर्भाव एस. या दोघांना संयुक्त विजेता घोषित करण्यात आले आणि त्या दोघांनी
‘सुपरस्टार सिंगर 3’ हा बहुमान पटकावला. या ट्रॉफी व्यतिरिक्त, अथर्व आणि आविर्भाव या दोघांना
प्रत्येकी 10 लाख रु. चा धनादेश देण्यात आला तर, संपूर्ण सीझनमध्ये प्रेक्षकांना आपल्या गायकीने
मंत्रमुग्ध करणाऱ्या, अंतिम फेरीतील बाकीच्या 7 स्पर्धकांना प्रत्येकी 1 लाख रु. चा धनादेश देण्यात आला.
अगदी ऑडिशनपासूनच हजारीबाग, झारखंडहून आलेल्या 12 वर्षीय अथर्व बक्षीने वेळोवेळी आपल्या
हृदयस्पर्शी आवाजाने श्रोत्यांना भुरळ घातली होती. संगीत क्षेत्रातील अनेक दिग्गजांनी त्याचे कौतुक केले.
सुपर जज नेहा कक्कडने त्याची तुलना त्याच्या भाववाही आवाजाची आणि गान कौशल्याची तुलना
अरिजीत सिंहशी केली. विकी कौशलने अथर्वच्या परफॉर्मन्सला दाद देताना म्हटले की त्याच्यासारखे गुणी
गायक संगीत क्षेत्रात आले, तर ती गौरवाची बाब असेल. अथर्वने म्हटलेले ‘पत्ता पत्ता बूटा बूटा’ हे गाणे
ऐकताना संगीतकार प्यारेलाल यांच्या अंगावर रोमांच उभे राहिले होते, तर त्याने गायलेले ‘हमारी अधूरी
कहानी’ विद्या बालनला इतके हेलावून गेले, की तिने आपल्या पतीला म्हणजे चित्रपट निर्माता सिद्धार्थ
रॉय कपूरला अर्थवला पार्श्वगायनाची संधी देण्यासाठी गळ घातली. पण, अर्थवसाठी सगळ्यात मोठी
सिद्धी ही होती की, अथर्वच्या वडिलांची आपल्या मुलाने संगीत क्षेत्रात जावे अशी इच्छा नव्हती, पण
त्याच मुलाने ही प्रतिष्ठित ट्रॉफी जिंकल्यावर मात्र त्यांची मान अभिमानाने उंच झाली आहे!
कोची, केरळहून आलेला आविर्भाव एस. म्हणजे छोटा पॅकेट बडा धमाका आहे! त्याने आपल्या स्वाभाविक
गोडव्याने आणि असामान्य गुणांनी सगळ्यांची मने काबिज केली. या चिमुरड्याची निष्ठा आणि स्टेजचे
भान त्याच्या वयाच्या मानाने अफाट आहे. आपल्या प्रत्येक परफॉर्मन्स-गणिक त्याने परीक्षकांना थक्क
केले. आविर्भावच्या ‘चाँद छुपा बादल में’ च्या परफॉर्मन्सला दाद देताना उदित नारायणने त्याला ‘सर्वात
सुंदर चाँद’ म्हटले, तर, गीता कपूरने त्याला ‘सात सुरों का शहजादा’ हे नाव दिले. आविर्भावने सगळ्यांच्या
मनात आपले खास स्थान निर्माण केले. त्याच्या बहुमुखी प्रतिभेचे दर्शनही या सीझनमध्ये घडले. होस्टची
भूमिका तो सहज निभावताना दिसला. जो त्याचा आणखी एक पैलू आहे. यात काहीच शंका नाही की,
त्याचा विजय हा त्याच्या असामान्य प्रतिभेची आणि अढळ श्रद्धेची साक्ष देणारा आहे.
अर्थव बक्षी आणि आविर्भाव एस. ला उज्ज्वल भविष्यासाठी खूप खूप शुभेच्छा!