“मी चाळीस चपात्या करणार नाही…” इरिना स्पष्टच म्हणाली…
‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सीझनमध्ये यंदा विविध सदस्यांचा समावेश झाला आहे. संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले सदस्य या घरात आपला खेळ खेळताना दिसत आहेत. यावेळी पहिल्यांदाच ‘बिग बॉस मराठी’च्या घरात एका विदेशी सदस्याने धमाकेदार एन्ट्री केली आहे. इरिना रुडाकोवा असं तिचं नाव असून, तिच्या येण्याने या घरात एक वेगळाच मसाला पाहायला मिळत आहे.”मी चाळीस चपात्या करणार नाही…” इरिना स्पष्टच म्हणाली…
इरिना रुडाकोवाला भारताविषयी आणि मराठी भाषेविषयी खूप प्रेम आणि आपुलकी आहे. तिने जेव्हा तिच्या आईला ‘बिग बॉस’च्या घरात जाण्याबद्दल सांगितले, तेव्हा तिच्या आईने तिला पूर्णपणे पाठिंबा दिला. इरिना म्हणते,”माझी आई म्हणाली, तुला आनंद मिळणार असेल तर मी सुद्धा आनंदी आहे”. घरात फोन नाही यावर इरिना म्हणाली ,” नेट आणि फोन नाही मला चालेल. मला फक्त शांती हवी आहे.”
इरिना पुढे म्हणाली,”मी ज्या देशात राहाते, तिथे ‘बिग बॉस’ नाही. पण दुसरा शो आहेत. मी लहान असताना असे शोज बघायचे आणि मला नेहमी प्रश्न पडायचा की, हे लोक घरात कसे राहातात? जर मी त्या परिस्थितीत असते तर काय केले असते? आता मी या परिस्थितीत प्रत्यक्षात आहे. तर समजतेय की ते कसे असते”.
घरातल्या कामांबद्दल इरिनाने सांगितले, “मी घरात ब्रेड बनवू शकते, पण चाळीस चपात्या नाही बनवू शकत. मला चपात्या बनवणे वेळ वाया घालवण्यासारखे वाटते. मी ब्रेड बनवते ब्रेड खा… पण इतर कामं मी करेन. ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनमध्ये इरिनाला मोठा चाहता वर्ग लाभणार हे निश्चित आहे. तिच्या आगमनाने घरात एक वेगळीच ऊर्जा आणि उत्साह पाहायला मिळत आहे. इरिना या शोमध्ये अजून काय जादू दाखवणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. तिच्या अनोख्या व्यक्तिमत्त्वामुळे ती प्रेक्षकांच्या मनात घर करेल आणि तिचा प्रवास निश्चितच रोमहर्षक असेल.
‘बिग बॉस’मराठीचा नवा सीझन करा एन्जॉय दररोज रात्री 9 वाजता पाहा. फक्त आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर आणि कधीही @officialjiocinema वर.
BigBossMarathi #MarathiRealityShow #MarathiEntertainment #BiggBossHouse #MarathiCelebrities #BiggBossContestants #MarathiDrama #BiggBossSeason #MarathiTVShow #BiggBossFans
Bigg Boss Marathi
Marathi reality showBigg Boss Marathi contestantsBigg Boss Marathi latest episodeWatch Bigg Boss Marathi onlineBigg Boss Marathi season updateBigg Boss Marathi hostBigg Boss Marathi votingBigg Boss Marathi winnerBigg Boss Marathi nominationsBigg Boss Marathi tasksBigg Boss Marathi eliminationBigg Boss Marathi live streamingBigg Boss Marathi episodes downloadBigg Boss Marathi evictionBigg Boss Marathi highlightsBigg Boss Marathi teasersBigg Boss Marathi gossipBigg Boss Marathi news updateBigg Boss Marathi finale dateMarathi Bigg Boss episodesBigg Boss Marathi house locationBigg Boss Marathi language reality showBigg Boss Marathi season premiereWhere to watch Bigg Boss MarathiBigg Boss Marathi castBigg Boss Marathi online voteBigg Boss Marathi TRP ratingsBigg Boss Marathi official websiteBigg Boss Marathi live feed