रासनेंचे एक आवाहन अन् वाढदिवसाला तीस हजार वह्या संकलित
‘माझ्या वाढदिवसाला भेटवस्तू नको, गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या आणा’, असा कौतुकास्पद उपक्रम हेमंत रासने यांनी राबवला. त्यांच्या या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला व तब्बल ३०,००० वह्या जमा झाल्या आहेत. जमा झालेल्या वह्या गरजू विद्यार्थ्यांना दिल्या जाणार आहेत. रासनेंचे एक आवाहन अन् वाढदिवसाला तीस हजार वह्या संकलित
भाजपा नेते हेमंत रासने हे समाजकारणात कायम प्रमाणात सक्रिय असतात. कसबा विधानसभा मतदारसंघातील कोणताही प्रश्न सोडण्यासाठी ते सर्वात पुढे असतात. १३ एप्रिलला वाढदिवसाचे औचित्य साधून रासनेंनी गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणात मदत करण्यासाठी भेट वस्तू ऐवजी वही भेट देण्याचे आवाहन केले होते. त्यांच्या या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला आणि तब्बल ३०,००० वह्या जमा झाल्या आहेत. त्यासाठी हेमंत रासनेंनी सर्वांचे आभार व्यक्त केले. तसेच या क्षणी हेमंत रासने भावूक झाल्याचेही पाहायला मिळाले. याप्रसंगी रासनेंच्या हस्ते रेशन कार्ड धारकांना ऑनलाईन रेशन कार्डचे वाटप देखिल करण्यात आले.

हेमंत रासने म्हणाले, सर्व शुभेच्छांचा मनापासून स्वीकार करतो. आपण कोणतीही भेटवस्तू न आणता गरजू विद्यार्थ्यांसाठी वह्या आणण्याच्या माझ्या आवाहनाला प्रतिसाद सर्वांनी तब्बल ३०,००० वह्या संकलित केल्या. हा माझ्यासाठी अतिशय भावनिक क्षण आहे या वह्या शिक्षण घेणाऱ्या गरजू विद्यार्थ्यांना नक्कीच मदतीला येतील. आपणा सर्वांचे पुन:श्च एकदा आभार मानतो आणि आपले प्रेम, स्नेह असाच कायम रहावा हीच सदिच्छा व्यक्त करतो”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
दरम्यान हेमंत रासने यांनी आपल्या जन्मदिनाची शुभ सुरुवात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या दर्शनाने केली.श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट मार्फत वाढदिवसाच्या निमित्ताने पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि विद्यावाचस्पती शंकर अभ्यंकर यांच्या शुभहस्ते हेमंत रासने यांचा सत्कार देखील करण्यात आला.
