Daily UpdateNEWS

सुळे,पवार,धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी

Share Post

लोकसभा निवडणुकीत प्रचारासाठी दिलेल्या खर्चापेक्षा अधिक खर्च होत असल्याचे  दिसून येत आहे.  पुणे जिल्ह्यातील लोकसभा उमेदवारांच्या खर्चा संदर्भात अपनी प्रजाहित पार्टी चे पुणे लोकसभा उमेदवार हेमंत पाटील यांनी पुणे जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली असून सुप्रिया सुळे, सुनेत्रा पवार, रवींद्र धंगेकर यांच्यावर खर्चाबाबत योग्य ती कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली आहे. सुळे,पवार,धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी

जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात पाटील यांनी म्हंटले आहे की,  सुप्रिया सुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार गट) चिन्ह तुतारी, सुनेत्रा पवार राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चिन्ह घड्याळ, रवींद्र धंगेकर काँग्रेस चिन्ह हाताचा पंजा यांनी आज दिनांक 18/04/2024 रोजी पुणे लोकसभा मतदारसंघात व बारामती लोकसभा मतदारसंघात अर्ज दाखल केलेले आहेत. हे अर्ज दाखल करताना तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाने घालून दिलेल्या नियमानुसार यांनी अफाट खर्च केलेला आहे.

सुप्रिया सुळे यांनी 1 कोटी 2 लाख, सुनेत्रा पवार यांनी एक कोटी पाच लाख, रवींद्र धंगेकर यांनी 99 लाख असा खर्च अर्ज भरतेवेळी केले आहे. यामध्ये पुणे लोकसभा व बारामती लोकसभा मतदारसंघातील जनतेला अर्ज भरतेवेळी आणून प्रत्येक मानसी 500 ते 800 रुपये देऊन लाखो लोक यावेळी उपस्थित होते. यावेळी गाड्यांच्या डिझेलचा खर्च स्पीकर खर्च, झेंडे उपरणे पाणी बॉटल जेवण खर्च, व्यासपीठांचा खर्च, मंडप खर्च, आधी खर्च करून या तिन्ही उमेदवारांनी अर्ज भरतेवेळी झालेल्या जाहीर सभेचा खर्च आपल्या लोकसभेच्या खर्चात दाखवणे बंधनकारक आहे. परंतु हे हा खर्च दाखवू शकणार नाहीत याबाबत आपण कठोर कारवाई करावी. या तिन्ही उमेदवारांनी निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा भंग केला आहे.

याबाबत आपण सविस्तर कसून चौकशी करून या खर्चाबाबत निवडणूक आयोग दिल्ली यांच्याकडे तक्रार करून या सर्व गोष्टीचा खुलासा करावा संबंधित उमेदवारावरती योग्य ती कारवाई करण्यात यावी. काँग्रेस, भाजपा, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट, शिवसेना शिंदे गट, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट, हे सर्व पक्ष आपल्या जाहीर सभेवरती कोटींचा खर्च करून निवडणूक आयोगाच्या नियमाचा भंग करीत आहेत. याबाबत कोणीच दखल घेऊन कारवाई करण्याबाबत प्रयत्न करीत नाही. 

पुण्यातील या घटनेबाबत मी स्वतः पुढे येऊन ही तक्रार करीत आहे. जर उमेदवारी अर्ज भरण्याच्या दिवशी लाखो करोडोंचा खर्च होत असेल तर मतदान होईपर्यंत हे तिन्हीही उमेदवार 25 ते 30 करोड रुपये खर्च करून या लोकसभेच्या निवडणुकीत निवडणूक आयोगाच्या आचारसंहितेचा व खर्चाबाबतीत अफाट खर्च करून नियमाचा भंग होत असल्याने. या तिन्ही उमेदवारांवरती कठोर कारवाई करण्यात यावी. तरी वरील प्रमाणे उमेदवारांच्या वरती, वरील प्रमाणे विषयावरती सहानभूतीपूर्वक विचार करून मला योग्य तो निर्णय देण्यात यावा ही नम्र विनंती.

सुळे,पवार,धंगेकर यांच्यावर कारवाई करण्याची हेमंत पाटील यांची मागणी