29/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलिज

निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलिज

निलेश साबळे यांच्या ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे!’ शोचा प्रोमो रिलिज

Share Post

“हसताय ना ? हसायलाच पाहिजे” असे म्हणत संपूर्ण महाराष्ट्राला पोट धरून हसायला भाग पाडणारा मराठमोळा अभिनेता, लेखक आणि दिग्दर्शक डॉ. निलेश साबळे हा त्याचा नवीन शो ‘हसताय ना ? हसायलाच पाहिजे’ हा शो घेऊन आला आहे.

नुकताच या शोचा प्रोमो रिलिज झाला असून मागील काही दिवसांपासून या नवीन शोचे बरेच प्रोमो, व्हिडिओ आणि चर्चा आपल्याला सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. तेव्हा पासूनच या शोची उत्सुकता प्रेक्षकांना लागली होती. अशातच आता या शोचा आणखी एक प्रोमो समोर आला असून या प्रोमोमध्ये शोच्या पहिल्या एपिसोडची झलक पाहायला मिळत आहे. या नवीन प्रोमोत ओंकार भोजने व भाऊ कदम यांच्या विनोदावर ‘बाईपण भारी देवा’ या चित्रपटाची संपूर्ण टीम पोट धरून हसताना दिसत आहे. या सोबत अभिनेते भरत जाधव व अलका कुबल या देखील ओंकार व भाऊ यांच्या विनोदावर हसत आहेत. या स्किटमध्ये हे दोघे ही स्त्रियांचे पात्र साकारत आपल्याला दिसतील. त्या दोघांच्या विनोदांनी प्रेक्षकांना पोट धरून खळखळून हसायला भाग पाडल्याचे दिसते. त्यामुळे ‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’च्या या नवीन प्रोमोला प्रेक्षकांनी प्रचंड लाईक्स व कमेंट्सचा चांगलाच वर्षाव होतोय.

‘हसताय ना? हसायलाच पाहिजे’ या शोचे लेखन, दिग्दर्शन डॉ. निलेश साबळे यांनी केले. तर भाऊ कदम, ओंकार भोजने या विनोदवीर सोबत सुपर्णा श्याम, स्नेहल शिदम आणि रोहित चव्हाण आदी कलाकारांचा देखील समावेश आहे. या शोचा नवीन प्रोमो तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर पाहू शकता. येणाऱ्या २७ तारखेपासून शनिवार-रविवार रात्री नऊ वाजता आणि कधीही #JioCinema वर तुम्ही पाहू शकता.

निलेश साबळे यांच्या 'हसताय ना? हसायलाच पाहिजे!' शोचा प्रोमो रिलिज