Daily UpdateNEWS

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद

Share Post

कोथरूड विधानसभा मतदारसंघातील भाजपा महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी यंदाही गुलाल उधळण्याचा निर्धार भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. या रॅली मध्ये असंख्य तरुण मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सोसायटीचे ज्येष्ठ नागरिक आणि गणेशोत्सव मंडळांकडून भव्य स्वागत करुन शुभेच्छा देण्यात आल्या.कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद

विधानसभा निवडणुकीला चांगलाच रंग चढत आहे. घरोघरी जाऊन मतदारांच्या भेटीगाठी, रोड शो, पदयात्रा यामुळे सगळीकडे निवडणूकमय वातावरण निर्माण झाले आहे. कोथरूड विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील प्रचारात अग्रेसर असल्याचे पाहायला मिळत आहे. चंद्रकांतदादा पाटील यांच्याकडून मतदारांच्या गाठीभेटींसह बाईक रॅलीद्वारे रोड शोद्वारे नागरिकांच्या भेटीगाठी घेत आहेत. या सर्व उपक्रमांना कोथरुडकरांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

सोमवारी संध्याकाळी कोथरुड मधील प्रभाग क्रमांक ११ मध्ये बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. वनाझ येथील किनारा हॉटेल चौकातून रॅलीला सुरुवात झाली. ठिकठिकाणी फटाक्यांची आतषबाजी, ढोलताशांचा निनाद , पुष्पवृष्टीने रॅलीचे स्वागत करण्यात आले. अनेक ठिकाणी महिलांकडून औक्षण करुन चंद्रकांतदादा पाटील यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या. दिव्यांग बांधवांकडूनही चंद्रकांतदादा पाटील यांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे शहराचे अध्यक्ष दिपकभाऊ मानकर, हर्षवर्धन मानकर, करण मानकर, रिपाइंचे ॲड मंदार जोशी, बाळासाहेब खंकाळ, भाजपा पुणे शहर सरचिटणीस पुनीत जोशी, भाजपा कोथरुड दक्षिण मंडल अध्यक्ष डॉ संदीप बुटाला, नगरसेविका छाया मारणे, भाजपाचे प्रभाग ११ चे अध्यक्ष आशुतोष वैशंपायन, अभिजीत राऊत, स्वाती मोहोळ, सुरेखा जगताप, दिनेश माझिरे, दत्ताभाऊ भगत, नाना कुंबरे, दिलीप उंबरकर यांच्या सह भाजप महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद
कोथरूडमध्ये यंदाही गुलाल आपलाच!चंद्रकांतदादा पाटील यांच्या रोड शोला भव्य प्रतिसाद