Daily UpdateNEWS

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती

Share Post

पुणे शहरातील वाढती लोकसंख्या, वाढता विस्तार आणि वाहतुकीचा ताण लक्षात घेता कायदा-सुव्यवस्था अधिक सक्षम असणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने महायुती सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुणे पोलिस आयुक्तालय हद्दीत सात नव्या पोलिस ठाण्यांची स्थापना करण्यात येणार असून, आंबेगाव, नांदेड सिटी, बाणेर, खराडी, वाघोली, काळेपडळ आणि फुरसुंगी या भागांचा समावेश आहे. यामुळे या निर्णयासाठी पाठपुरावा करणाऱ्या कोथरूडच्या आमदार चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांना यश लाभले आहे.महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६० कोटींचा निधी
नवीन पोलिस ठाण्यांच्या निर्णयासोबतच पुणेकरांच्या सुरक्षिततेसाठी तब्बल ६० कोटी रुपयांचा निधी आणि ८१६ अतिरिक्त पोलिस कर्मचारीही उपलब्ध करून देण्यात आले आहेत. त्यामुळे, पुणे शहरात कायदा-सुव्यवस्था मजबूत करण्यासाठी एक प्रभावी आणि ठाम पाऊल उचलण्यात आले आहे.

महायुती सरकारचं सुरक्षित पुण्यासाठी मोठं पाऊल, ७ नव्या पोलिस ठाण्यांची निर्मिती, ८१६ पोलिस, ६० कोटींचा निधी


महायुती सरकारच्या या निर्णयामुळे पुण्यात पोलिस दलाची ताकद आणखी वाढणार आहे. यासोबतच पुणे शहरात हजारो नवीन सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहेत. दक्ष पोलिस अधिकारी आणि सीसीटीव्ही यंत्रणेमुळे पुणेकरांना एक सुरक्षित वातावरण मिळणार आहे.
सर्वसामान्य पुणेकरांना हा निर्णय निश्चितच दिलासा देणारा ठरतो आहे. पुणेकर या निर्णयासाठी महायुतीला मनापासून धन्यवादही देत आहेत.