NEWS

मुखपृष्ठाच्या माध्यमातून ग्राहक पेठेच्या ‘संस्कारक्षम वह्या’ उपक्रम

Share Post

शालेय वह्यांवरील संस्कारक्षम मुखपृष्ठांच्या माध्यमातून ग्राहक पेठ अनेक वर्ष संस्कारक्षम वह्या असा उपक्रम राबवित आहे. या वह्या सवलतीच्या दरात देण्यात येतात. आजच्या काळात वह्यांवर विविध अभिनेता-अभिनेत्रींची चित्रे असतात. मात्र, वह्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांवर चांगले संस्कार व्हावे हा ग्राहक पेठेचा प्रयत्न असल्याची माहिती ग्राहक पेठेचे कार्यकारी संचालक सूर्यकांत पाठक यांनी दिली. मुखपृष्ठाच्या माध्यमातून ग्राहक पेठेच्या ‘संस्कारक्षम वह्या’ उपक्रम

ग्राहक पेठेमध्ये यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज, संत ज्ञानेश्वर, स्वामी विवेकानंद अशा थोर पुरुषांची चित्रे मुखपृष्ठावर असलेल्या वह्या उपलब्ध आहेत. तसेच यंदा पर्यावरणावरील समतोल राखा, सेव्ह ट्री, व्यायाम हा आरोग्याचा मुलभूत पाया, एक पाऊल स्वच्छतेकडे, जल है तो कल है, मोबाईलवरील खेळ खेळण्यापेक्षा मैदानावरील खेळ खेळा अशा प्रकारचे विविध सामाजिक संदेश देणा-या वह्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध केल्या आहेत. मुलांकरीता खास विद्यार्थी दालन करण्यात आले असून त्यामध्ये वह्यांमधील प्रकार ग्राहक पेठेमध्ये आहेत.

सूर्यकांत पाठक म्हणाले, विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना थोर पुरुषांची चित्रे पाहून त्यांचा आदर्श घ्यावा. तसेच मुखपृष्ठावरील विविध संदेशांप्रमाणे अनुकरण करावे आणि प्रत्यक्ष कृतीत देखील त्यांच्याकडून चांगले वर्तन घडावे. यासाठी हा अनोखा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येतो. वह्यांव्यतीरिक्त लंच बॉक्स, वॉटर बॉटल, पेन्सिल पाऊच, पेन्सिल बॉक्स, छत्र्या यांसारखे शालेय साहित्य देखील सवलतीच्या दरात उपलब्ध आहे.

मुखपृष्ठाच्या माध्यमातून ग्राहक पेठेच्या ‘संस्कारक्षम वह्या’ उपक्रम