गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासहरिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत
गोदरेज ॲण्ड बॉयसचे व्यवसायिक युनिट असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसने पुण्यातील पिरंगुट येथे रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पाचा विस्तार केला आहे. गोदरेज अँड बॉयसचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक जमशेद एन. गोदरेज यांच्या हस्ते रिसर्च आणि डेव्हलपमेंट सेंटर ॲनेक्सीचे उद्घाटन करण्यात आले. ब्रँडच्या इनहाऊस डेव्हलपमेंटल आणि टेस्टिंग लॅबच्या सध्याच्या क्षमता दुप्पट करणे हे या धोरणात्मक विस्ताराचे उद्दिष्ट आहे. यामुळे कंपनीची कल्पना, गुणवत्ता आणि तांत्रिक प्रगती होईल.गोदरेज अप्लायन्सेसने पायाभूत सुविधांच्या विस्तारासहरिसर्च आणि डेव्हलपमेंट क्षमता केल्या मजबूत
43,000 चौरस फूट अतिरिक्त नवीन क्षेत्रासह विस्तारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे ब्रँडला त्यांच्या रिसर्च आणि डेव्हलपमेंट विभागातील मनुष्यबळाची क्षमता दुप्पट करता येईल. यासह NABL मान्यताप्राप्त प्रयोगशाळा आणि प्रगत अत्याधुनिक पायाभूत सुविधा विकास प्रक्रिया सक्षम करतात. हा विस्तार म्हणजे ग्राहकांना अत्याधुनिक आणि ऊर्जा-कार्यक्षम उत्पादने वितरीत करण्याच्या गोदरेजच्या दीर्घकालीन धोरणाचा एक भाग आहे. इमारतीची स्वतःची रचनादेखील वेगळ्या प्रकारे करण्यात आली आहे. विजेच्या खर्चात मोठ्या प्रमाणात कपात करण्याच्या उद्देशाने येथे नैसर्गिक प्रकाशाचा जास्तीत जास्त वापर करण्यात येत आहे. एकत्रित काम करता यावे, एकमेकांशी माहितीचे आदान-प्रदान करता यावे अशा रितीने कार्यालयाची रचना करण्यात आली आहे. ओपन ऑफिस डिझाइन आणि पारदर्शकता असलेला हा प्रकल्प आहे.
यावर भाष्य करताना,गोदरेज आणि बॉयसचा भाग असलेल्या गोदरेज अप्लायन्सेसचे व्यवसाय प्रमुख आणि कार्यकारी उपाध्यक्ष कमल नंदी म्हणाले की, “गोदरेज अप्लायन्सेसमध्ये, उत्पादन विकास हा आमच्या ब्रँडचा कणा आहे, याची आम्हाला जाणीव आहे. त्यामुळे, आम्ही नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्यासाठी रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी महत्त्वपूर्ण गुंतवणूक केली असून, ती आमच्या आमच्या यशासाठी मोलाची आहे, असे आम्हाला वाटते. या सुधारित रिसर्च आणि डेव्हलपमेंट प्रकल्पामुळे पिरंगुटमध्ये आमचा एकत्रित रिसर्च आणि डेव्हलपमेंट वरील गुंतवणूक खर्च 100 कोटी रु.च्या जवळपास पोहोचला आहे. आमच्या ग्राहकांच्या विकसित गरजा पूर्ण करणारी उत्कृष्ट उत्पादने वितरीत करण्यासाठी आमचे समर्पण यातून दिसून येते. या विस्तारासह, आम्ही आमच्या उत्पादन
विकासाच्या कालमर्यादेला गती देण्यासाठी आणि आगामी काळात बाजारात अधिक प्रगत उपकरणे सादर करण्यास तयार आहोत.”
About Godrej Appliances
Godrej Appliances, a business unit of Godrej & Boyce, is one of the leading Home Appliances players in India. Godrej & Boyce was the first Indian Company in 1958 to manufacture refrigerators and since then Godrej Appliances has expanded its portfolio across several categories like Washing Machines, Air Conditioners, Microwave Ovens, futuristic Thermo-electric cooling solutions, Air Coolers, Deep Freezers, highly specialized Medical Refrigerators, Dishwashers, and the specialized Insulin Cooler. This portfolio has been powered by the driving philosophy of ‘Things Made Thoughtfully.’
Environment protection is a core value at Godrej and our products and processes are based on both human-centric design and planet-centric design. Both manufacturing units of Godrej Appliances became the first in India to win the coveted Platinum Plus Green Co. certification for their pioneering eco-friendly practices. The brand takes pride in its carefully designed products and environment-friendly technologies. Further to this, it promptly provides the best-in-class consumer – rated after-sales service through more than 680 service centers and 4500+ SmartBuddy service experts pan-India.
To learn more visit: https://www.godrej.com/godrej-appliances