Latest News

जेन्टियम कॅपिटलकडून भारतात ५ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक नियोजन आरोग्य, ऊर्जा आणि संर क्षण क्षेत्रांवर भर

Share Post

जेन्टियम कॅपिटल एलएलपी, या आंतरराष्ट्रीय खाजगी इक्विटी कंपनीने, पुण्यात आपले पहिले कार्यालय सुरू केले आहे, ज्याद्वारे भारतासारख्या वेगाने वाढणाऱ्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर विस्ताराची सुरुवात होणार आहे. कंपनीने पुढील पाच वर्षांसाठी ५ अब्ज डॉलर्सची गुंतवणूक योजना जाहीर केली आहे, जी मुख्यतः आरोग्य, ऊर्जा आणि संरक्षण उत्पादन या क्षेत्रांवर केंद्रित असेल.जेन्टियम कॅपिटलकडून भारतात ५ अब्ज डॉलर्सचे गुंतवणूक नियोजन आरोग्य, ऊर्जा आणि संर क्षण क्षेत्रांवर भर

जेन्टियम कॅपिटलचे व्यवस्थापकीय भागीदार, अभिषेक बाळ, यांनी भारताच्या विकासावर विश्वास व्यक्त करताना सांगितले की, “भारताची भरभराट करणारी स्टार्टअप इकोसिस्टम आणि विस्तारत चाललेला मध्यमवर्ग यामुळे मोठ्या संधी निर्माण होत आहेत. आरोग्य, ऊर्जा आणि संरक्षण यासारख्या प्रचंड क्षमता असलेल्या आणि वेगाने वाढणाऱ्या क्षेत्रांवर आम्ही लक्ष केंद्रित करीत आहोत.”

जेन्टियम कॅपिटलचे आरोग्य क्षेत्राविषयक धोरण भारतातील वेगाने वाढणाऱ्या या क्षेत्रावर लक्ष केंद्रित करते. सध्याच्या १०० अब्ज डॉलर्स मूल्याचे रुग्णालय क्षेत्र, ६ अब्ज डॉलर्स मूल्याचे टेलीमेडिसिन क्षेत्र तसेच, मेडिकल टुरिझम यामध्ये दुपटीने वाढ होण्याची शक्यता आहे. “आमच्या पोर्टफोलिओमधील ५०% गुंतवणूक आरोग्य क्षेत्रात केली जाणार असून, ५-७ वर्षांमध्ये ९ ते ११ पट परतावा मिळवण्याचे आमचे उद्दिष्ट आहे,” असे बाळ यांनी नमूद केले.कंपनी भारतातील पुनर्वापर ऊर्जा आणि संरक्षण उत्पादन या क्षेत्रातही रस घेत आहे. जेन्टियमचे सह-संस्थापक आणि भागीदार, लक्ष्य यांनी सांगितले की, ‘मेक इन इंडिया’ आणि उत्पादन-संबंधित प्रोत्साहन योजना (PLI) यांसारख्या सरकारी उपक्रमांमुळे या क्षेत्रात मोठी वाढ होत आहे. वार्षिक ३०% दराने वाढ होत असलेली, पुनर्वापर ऊर्जा बाजारपेठ २०३० पर्यंत २२ अब्ज डॉलर्सवरून १०० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

भारताचे संरक्षण क्षेत्र, विशेषतः एव्हिओनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि रडार प्रणालींमध्ये, झपाट्याने विस्तारत आहे, तसेच संरक्षण निर्यातीमध्येही २२% वार्षिक वाढ होत आहे. “या उच्च क्षमतेच्या बाजारपेठेत आघाडीवर असलेल्या कंपन्यांना पाठबळ देण्यास आम्ही उत्सुक आहोत,” असे लक्ष्य यांनी सांगितले.

आगामी काळात, जेन्टियम कॅपिटल, मुंबई आणि बंगलोर येथेही आपली कार्यालये सुरू करणार असून, पुढील २-३ वर्षांत वरिष्ठ आणि मध्यम स्तरावरील भरती करणार आहे.

भारत एक जागतिक आर्थिक महासत्ता बनत असताना, जेन्टियम कॅपिटल, भारताच्या महत्त्वाकांक्षी विकास ध्येयांशी सुसंगत अशा क्षेत्रांमध्ये धोरणात्मक गुंतवणूकदार म्हणून आपली भूमिका प्रस्थापित करत आहे.