Latest News

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने  ‘१० वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न 

Share Post

विद्यार्थ्यांची दहावी झाली की कोणत्या शाखेला प्रवेश घ्यावा, कॉलेज कसे निवडावे, स्वायत्त महाविद्यालय म्हणजे काय ? करिअर कोणत्या विषयात करावे असे अनेक प्रश्न विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पडतात असतात. विद्यार्थी आणि पालकांच्या मनातील या प्रश्नांचे कोडे सोडविण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने प्रा. कौस्तुभ अत्रे यांच्या ‘१० वी नंतर करिअर गाईडन्स’ या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने  ‘१० वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न 

स्वातंत्र्यवीर सावरकर अध्यासन केंद्र, कर्वे रोड, पुणे येथे संपपण झालेल्या या व्याख्यानाला स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशनचे अध्यक्ष  प्रीतम थोरवे, सचिव मेघश्याम देशपांडे, विश्वस्त प्राची देशपांडे, वृषाली देशपांडे आदी मान्यवरांसाह विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. फाउंडेशनच्या वतीने प्रत्येक सहभागी विद्यार्थ्याला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे पुस्तक भेट देण्यात आले. 

विद्यार्थी आणि पालकांना मार्गदर्शन करताना प्रा. कौस्तुभ अत्रे म्हणाले, आपले मित्र – मैत्रिणी कोणत्या कॉलेजमध्ये, कोणत्या शाखेत  प्रवेश घेणार आहेत किंवा पालकांची इच्छा काय आहे? यावर अनेकदा विद्यार्थी त्यांच्या शाखेची किंवा महाविद्यालयाची निवड करतात. मात्र तसे न करता तुम्हाला काय आवडते, महाविद्यालय तुमच्या सोईचे आहे का? महाविद्यालयांचा कट ऑफ किती आहे? याचाही विचार होणे आवश्यक असते. 12 वी नंतर काय करायचे आहे हे जर लवकर ठरवता आले तर अधिक चांगले ठरू शकते. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर चांगले यश संपादन करण्यासाठी वेळेचे नियोजन महत्वाचे आहे तसेच आवश्यकता असल्यास क्लासेस लावायला हरकत नसल्याचेही प्रा. कौस्तुभ अत्रे यांनी सांगितले.

स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने  '१० वी नंतर करिअर गाईडन्स' संपन्न 
स्वातंत्र्यवीर सावरकर फाउंडेशन च्या वतीने  ‘१० वी नंतर करिअर गाईडन्स’ संपन्न