वडगावशेरी विधानसभा भाजपाचे माजी आमदार जगदीळ मुळीक लढणार !
पुण्यातील आठ विधानसभा मतदारसंघांपैकी वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघ सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. भाजपला मानणाऱ्या वडगाव शेरी मतदार संघात भाजपचा उमेदवार असावा, अशी स्थानिकांची अपेक्षा आहे.वडगावशेरी विधानसभा भाजपाचे माजी आमदार जगदीळ मुळीक लढणार !
मात्र विद्यमान आमदार महायुतीचाच घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी कॉँग्रेसचे असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीत हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला जाणार की भाजपच्या? असा प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र भाजपचे माजी आमदारआणि माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी विधानसभा निवडणुकीसाठी दंड थोपटले असून वडगावशेरी विधानसभा भाजप लढवणार असल्याची चर्चा सर्वत्र सुरू झाली आहे. वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे विद्यमान आमदार आहेत. तर भाजपचे माजी आमदार जगदीश मुळीक यांनी देखील हा विधानसभा मतदारसंघ आपल्याला मिळावा, यासाठी आग्रह धरला असून नुकतेच त्यांनी मतदारांना आवाहन करणारे एक पत्र लिहिले आहे. या पत्रात त्यांनी “२०१९ ला थोडक्यात पराभव झाला. मात्र दुसऱ्या दिवसापासून कामाला लागलो, आमदार असताना काम केले, शहराध्यक्ष असताना तत्कालीन सरकारला धारेवर धरले. आता विधानसभेच्या निवडणुका समोर येऊन ठेपल्या आहेत. आपली साथ, प्रेम आणि आशीर्वाद पुन्हा हवे आहेत. यावेळी तुमच्या या सेवकाला अजून ताकदीने आणि अधिक जोमाने आपल्या सहकार्याची आवश्यकता लागेल”, असे म्हटले आहे. जगदीश मुळीक यांनी मतदारांना केलेले हे भावनिक आवाहन प्रभावी ठरण्याची शक्यता आहे.दरम्यान, वडगावशेरी विधानसभा मतदारसंघांमध्ये उमेदवारीवरून महायुतीत तिढा निर्माण होण्याची शक्यता असली वर्तवली जात आहे, मात्र या मतदारसंघात भाजपची ताकद जास्त असल्यामुळे मतदारसंघ भाजपच्या वाट्यालाच जाणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.मागील १५ वर्षांत वडगाव शेरी मतदारसंघात मोठ्या प्रमाणात नागरीकरण झाले. त्यानंतर येथे भाजपला मानणारा मतदारवर्गही वाढला आहे. याचा थेट परिणाम २०१४ च्या निवडणुकीत मतदारांनी आपले दान भाजपचे मुळीक यांच्या बाजूने टाकण्यात झाला. त्यानंतर मतदारसंघात भाजपचे कार्यकर्ते तळागाळापर्यंत वाढले आहेत. २०१९ च्या निवडणुकीत भाजपचे उमेदवार मुळीक यांचा अत्यंत कमी मतांच्या निसटत्या फरकाने पराभव झाला होता.कोणतेही पद नसतानाही जगदीश मुळीक यांचा मतदारसंघातील दांडगा जनसंपर्क, पहिल्या टर्म मध्ये केलेली विकासकामे आणि मुळीक यांचे फडणवीस यांच्याशी असलेले निकटचे संबंध. तसेच,,वरिष्ठांनी विधानसभा लढवण्यासाठी दिलेला ग्रीन सिग्नल या सर्व बाबी पहाता वडगावशेरी मतदारसंघ भाजपच्या वाट्याला येईल असा विश्वास कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.