Daily UpdateNEWS

युरोकिड्सतर्फे पुण्यात हार्वर्ड-प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण

Share Post

युरोकिड्स या भारतातील आघाडीच्या प्रीस्कूल एक्सपर्ट कंपनीला त्यांच्या हेयुरेका – दृश्य वैचारिक अभ्यासक्रमाची आठवी आवृत्ती लाँच करताना आनंद होत आहे. हार्वर्ड विद्यापीठाच्या प्रोजेक्ट झीरोपासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आणि राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० शी सुसंगत सर्वसमावेशक विकासाचे धोरण ठेवणारा हेयुरेका अभ्यासक्रम लहान विद्यार्थ्यांम्ये सर्जनशील विचार कौशल्य विकसित करेल. युरोकिड्सतर्फे पुण्यात हार्वर्ड-प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण

युरोकिड्सच्या महत्त्वाकांक्षी विकास धोरणाचा एक भाग म्हणून प्रीस्कूल नेटवर्कने पुणे व महाराष्ट्रात आणखी विस्तार करण्याचे ठरविले आहे. युरोकिड्सने पुढील पाच वर्षांत राज्यात ३२५ नवी केंद्रे सुरू करत महाराष्ट्रातील केंद्रांची संख्या ४०० वर नेली आहे. या विस्ताराद्वारे राज्यातील प्राथमिक शिक्षणाचा दर्जा उंचाविण्याचे ध्येय आहे. प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील आघाडीची कंपनी या नात्याने युरोकिड्सला ते दर्जेदार असण्याची गरज माहीत आहे आणि म्हणूनच कंपनीद्वारे अभ्यासक्रम सातत्याने अद्ययावत ठेवला जातो.

हेयुरेका मुलांना ‘काय’ विचार करायचा, हे सांगण्याऐवजी त्यांना ‘कसा’ विचार करायचा, याची कौशल्ये आत्मसात करायला मदत करणार आहे. या अभ्यासक्रमात २० वैशिष्ट्यपूर्ण पद्धतीच्या, हार्वर्ड प्रेरित थिंकिंग रूटिन्सचा समावेश असून, त्यामुळे लहान मनांमध्ये उत्सुकता, कल्पनाशक्ती आणि विचार कौशल्य विकसित होते. मुलं फक्त माहिती घेत नाहीयेत, तर ती सक्रियपणे त्याचा वापर करत आहेत व त्यांच्यामध्ये सखोल आकलन आणि सर्जनशीलता विकसित होत आहे, याची काळजी या अभ्यासक्रमाद्वारे घेतली जाते.

१८ महिन्यांचे कठोर संशोधन, प्राथमिक चाचणी व आवश्यक बदलांनंतर हेयुरेकाला ईपिक्स तत्त्वाची तोड देण्यात आली आहे. त्यामध्ये एरवी शिक्षण क्षेत्रात दुर्लक्ष केल्या जाणाऱ्या भावनिक, शारीरिक, बौद्धिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक अशा पाच महत्त्वाच्या विकास जागांचा समावेश करण्यात आला आहे. १३ वैशिष्ट्यपूर्ण प्रोग्रॅम या अभ्यासक्रमाचे प्रमुख स्तंभ असून (कोडक्वेस्ट, युरोकनेक्ट, युरोफिट, युरोआर्ट, एलेव्हेट आणि इतर बरंच काही), ते प्रत्येक मुलाला फक्त शैक्षणिक यशच नव्हे, तर आयुष्यभर पुरणारा वैयक्तिक विकास साधण्यासाठी मदत करेल.

युरोकिड्सतर्फे पुण्यात हार्वर्ड-प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण
युरोकिड्सतर्फे पुण्यात हार्वर्ड-प्रेरित हेयुरेका अभ्यासक्रमाचे अनावरण

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी केव्हीएस सेशसाई, मुख्य कार्यकारी अधिकारी, प्रीके विभाग (युरोकिड्स), लाइटहाउस लर्निंग म्हणाले, ‘युरोकिड्समध्ये आम्ही अगदी दोन वर्षे वयाइतक्या लहान मुलांमधली उत्सुकता आणि विचार कौशल्य विकसित करत आयुष्यभराचा पाया घालत असतो. डॉ. अनिता मदन, प्रमुख- अभ्यासक्रम विकास विभाग यांनी हेयुरेका हा लहान मुलांसाठीच्या शिक्षण क्षेत्रातील अनोखा अभ्यासक्रम तयार केला आहे. आमचा सर्वसमावेशक दृष्टिकोन लहान मुलांना फक्त शाळेसाठीच नव्हे, तर आयुष्यभरासाठी तयार करतो व त्यांना सातत्याने बदलत असलेल्या जगासाठी आवश्यक कौशल्यांनी सक्षम असतो. हा अभ्यासक्रम विचारवंत, इनोव्हेटर्स आणि उद्याच्या लीडर्सना कशा प्रकारे आकार देतो, हे पाहण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत. या नव्या अभ्यासक्रमाच्या मदतीने आम्ही पुणे व महाराष्ट्रातील आमचे अस्तित्व आणखी बळकट करण्याचे ध्येय ठेवले आहे.’

या अभ्यासक्रमाच्या लाँचविषयी युरोकिड्सच्या अभ्यासक्रम विभागाच्या प्रमुख डॉ. अनिता मदन म्हणाल्या, ‘हेयुरेका हा प्राथमिक शिक्षण क्षेत्रासाठी क्रांतिकारी दृष्टिकोन मांडणारा आहे. ईपिक्स फ्रेमवर्कच्या मदतीने आम्ही बुध्यांकावर (आयक्यू) लक्ष केंद्रित करत आहोत, तसेच भावनिक, शारीरिक, सर्जनशील आणि आध्यात्मिक पैलूंवर काम करत चौफेर विकास करत आहोत. मुलांनी केवळ प्रश्नांची उत्तरे देऊ नयेत, तर उत्तरांवरही प्रश्न उभे करावेत, यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची आमची इच्छा आहे. यामुळे उत्सुकता, वैचारिक विश्लेषण आणि भोवतालच्या जगासह सखोल नाते त्यांच्यात रुजवेल. शैक्षणिक तयारीबरोबरच हेयुरेका मुलांना नाती जोडण्यासाठी, अडचणी सोडविण्यासाठी आणि जगाशी अर्थपूर्ण पद्धतीने संवाद साधण्यासाठी आवश्यक कौशल्यांचा विकास करण्यासाठी चालना देणारी मानसिकता विकसित करत आहे.’

एनईपी २०२० शी सुसंगत असलेला हा अभ्यासक्रम पंचकोश किंवा मानवी अस्तित्वाचे पाच पैलू या प्राचीन भारतीय संकल्पनेवर आधारित समग्र विकासावर भर देणारा आहे. हेयुरेकामध्ये या तत्त्वांचे शैक्षणिक विचारसरणीत रुपांतर करण्यात आले आहे. युरोकिड्स आपले होमबडी अपमध्ये या अभ्यासक्रमाशी सुसंगत बदल करत असून, आकलनात्मक विकासाला पाठिंबा देणारा समृद्ध संवादी कंटेंट उपलब्ध करत समतोल स्क्रीन टाइम मिळवून दिला जाणार आहे.

२३ वर्षांचा अनुभव आणि ४०० शहरांतील १,६०० पेक्षा जास्त प्रीस्कूलचे नेटवर्क व आतापर्यंत ७,००,००० विद्यार्थ्यांचा विकास करत, युरोकिड्स लहान मुलांना भविष्यासाठी सज्ज करण्यात आघाडीवर आहे. हा अभ्यासक्रम युरोकिड्सची सर्वसमावेशक विकास झालेले लर्नर्स तयार करण्याची बांधिलकी अधोरेखित करणारा असून, त्यामुळे प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील कंपनीचे आघाडीचे स्थान अधोरेखित झाले आहे.

About EuroKids Preschool:

EuroKids is recognised as India’s Most Trusted Preschool Brand, with over 23 years of experience, and has 1600+ preschools across 400 cities. The journey began in 2001 with two preschools. Since then, the group has consistently raised the bar for preschool education through its innovative and mindful curriculum – EUNOIA, which helps children grow holistically in a home-like environment. The foundational belief provides every child with a Flying Start, enabling excellent future success. Also, the EuroKids franchise model supports new entrepreneurs in the education sector to thrive and helps them set up their preschools.

The Group –

EuroKids is part of Lighthouse Learning, India’s Leading Early Childhood & K-12 Education group. The group is driven by its purpose to unlock human potential and ignite the Love for Learning in every child.  With its portfolio of brands – EuroKids Pre-School, Kangaroo Kids International Preschool, EuroSchool, Billabong High International, Centre Point Group of Schools, Heritage International Xperiential School and Heritage Xperiential Learning School, Lighthouse Learning is committed to delivering holistic development of its 175,000+ students across its network of over 1,600+ Pre-Schools and 50+ Schools. Lighthouse Learning Group empowers more than 1300+ women entrepreneurs nationwide and employs a talented workforce of over 15,000 people across its offices and campuses.