ईनोरा-नो हाऊ फाउंडेशन (KHF)ने संशोधित केलेले कंपोस्टर प्लँटर तंत्रज्ञान १०००० घरांमध्ये पोचवल्याची घोषणा
कचरा व्यवस्थापन, सेंद्रिय शेती व मृदा संवर्धन या क्षेत्रातील अग्रगण्य संस्था, ईनोरा – नो हाऊ फाउंडेशन (KHF) ने संशोधित केलेले कंपोस्टर प्लँटर हे तंत्रज्ञान १०००० घरांमध्ये पोचवल्याची घोषणा संस्थेने अभिमानाने केली. इनोरा – नो होऊ फाउंडेशन विकेंद्रित पद्धतीने प्रतिदिन 750 टन जैविक कचऱ्यावर कंपोस्टिंग द्वारे प्रक्रिया करते. या महत्त्वपूर्ण घटनेचा अर्थ असा आहे की इनोरा – KHF ने 10000 कुटुंबांना त्यांचा कचरा त्यांच्या घरी व्यवस्थापन करण्यासाठी ” माझा कचरा , माझी जबाबदारी ” मोहिमेत सामील करून घेतले आहे .
याची पुढची पायरी म्हणजे पुणे शहर कचरा मुक्त करण्यासाठी इनोरा नो होऊ फाऊंडेशन सर्व प्रकारच्या कचरा व्यवस्थापनाबाबत नागरिकांच्या शंका आणि समस्यांचे निराकरण करण्यासाठी एक हेल्पलाइन नंबर, +91 8956391972 सुरू करत आहे. हा हेल्पलाइन नंबर कचरा नियोजनासाठी थेट नागरिकांच्या प्रयत्नांना हातभार लावण्याचं काम करेल. महात्मा गांधीजी यांच्या जयंतीच्या उद्देशाने आणि लोकांमध्ये कचरा व्यवस्थापनाच्या धोरणाला पुरेपूर साथ देण्यासाठी आज हेल्पलाईन नंबर लाँच करत आहे.
नो होऊ फाउंडेशन सर्व पुणेकरांना ” #पुणेतिथेकचराउणे” हॅशटॅग वापरून सोशल मीडियावर शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी त्यांचे वैयक्तिक योगदान शेअर करण्याचे आवाहन करत आहे. या उपक्रमाचा उद्देश जबाबदार कचरा व्यवस्थापनामध्ये शहरव्यापी सहभागास प्रेरित करणे हा आहे.
पत्रकार परिषदेला KHF चे वरिष्ठ संघ सदस्य आभा तडवळकर आणि आदित्य जोशी यांनी संबोधित केले. त्यांना पाठिंबा देण्यासाठी ज्येष्ठ विश्वस्त नूतन भाजेकर, वृंदा पन्हाळकर आणि मंजुश्री तडवळकर यांच्यासह वरिष्ठ संघ सदस्य कुमार ओव्हाळ आणि विजय भालेकर उपस्थित होते.
चौकशी आणि अधिक माहितीसाठी
इनोरा – नो होऊ फाउंडेशन
हेल्पलाईन नंबर : +९१ ८९५६३९१९७२