Daily UpdatePune | NEWS

भाऊ,तात्या कोण नाही, तर मोहोळ निवडून येणार एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

Share Post

महायुतीचे अधिकृत उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचाराकरीता आज पुण्यात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महायुतीचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी झाडून हजेरी लावली. तर इथं आता भाऊ तात्या कोणी नाही. मुरली अण्णाच निवडून येतील. असे मोठं विधान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं.भाऊ,तात्या कोण नाही, तर मोहोळ निवडून येणार एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य

यावेळी मुख्यमंत्री शिंदे बोलतांना म्हणाले, गिरीश बापटांचा वारसा आता यापुढे मुरलीधर मोहळांना चालवायचं आहे. गिरीश बापट यांचं काम गेल्या अनेक वर्षांपासून आपण पाहिलं आहे. त्यांचे आणि माझे अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध आहे. विधानसभेत ज्या ज्या वेळी अडचण येत होती. त्यावेळी त्यांनी मला मदत केली. पुणेकरांचं प्रश्न मांडले. विकासासाठी सातत्याने झटत होते. पुण्यातून आता तसाच खासदार दिल्लीत जाणार आहे.

“इथं आता भाऊ तात्या कोण नाही, मोहोळच निवडून येतील असा विश्वास देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी व्यक्त केला.  मुरलीअण्णांनी बुथ कार्यकर्ता ते खासदारकीसाठी उमेदवार असा प्रदीर्घ प्रवास केला आहे. मोदींनी बुथच्या स्तरावरील कामाचं कौतूक केल. असं म्हणत मुरलीअण्णांच्या कुटुंबाला पैलवानकीचा वारसा आहे.  महाराष्ट्र केसरी स्पर्धेत देखील त्यांनी महत्वाचं योगदान दिलं आहे.  त्यामुळे पैलवान असल्याने कधी कुठे डाव टाकायचं हे त्यांना माहिती आहे. हा आखाडा तर मुरली मोहोळ जिंकणारच. स्वार्थासाठी आखाडा बदलणारा पैलवान आपल्या पैलवानसमोर टिकणार नाही.

मोहोळ आणि इतर सगळे उमेदवार रेकॉर्ड ब्रेक मताने विजयी होतील. आपल्या महायुतीचं वातावरण राज्यभर असून आपली मोठी ताकद आहे. गेल्या ३० वर्षांपासून आपली नैसर्गिक युती आहे. यातच काही विघ्न आलीत. परंतु युती केली आणि त्यात अजित पवार सोबत आले. त्यामुळे महायुती आणखी मजबुत झाली. असेही एकनाथ शिंदे म्हणाले.

महायुतीच्या मेळाव्याला अजित पवार यांनी देखील संबोधित केले. यावेळी जिंकण्यासाठी महायुतीच्या प्रत्येक कार्यकर्त्यांनी झोकून देऊन काम केल पाहिजे. अस अजित पवारांनी सांगितले. तर या मेळाव्याला शिवाजीराव आढळराव शिरूर लोकसभेचे उमेदवार हे देखील उपस्थित होते.

भाऊ,तात्या कोण नाही, तर मोहोळ निवडून येणार एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
भाऊ,तात्या कोण नाही, तर मोहोळ निवडून येणार एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य