Daily UpdateNEWS

मानवी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिक्षण महत्वाचे-उल्हास पवार

Share Post

“सृष्टीवर वाढत जाणार्‍या मानवी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिक्षण म्हणजे शहाणपण आणणे गरजेचे आहे. संकटात सापडलेल्या वाळवंटात पाण्याचा झरा जसा हवा असतो तसे सामाजिक व्यवस्थेसाठी शिक्षण महत्वाचे आहे.”  असे विचार उर्वरित वैधानिक विकास महामंडळाचे माजी अध्यक्ष उल्हास पवार यांनी व्यक्त केले.
देशातील शिक्षण क्षेत्रात माइल स्टोन ठरलेली माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा ४२वा स्थापना दिवस कोथरूड येथील एमआयटी डब्ल्यूपीयू मधील संत ज्ञानेश्वर सभागृहात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.मानवी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिक्षण महत्वाचे-उल्हास पवार

माईर्स एमआयटी शिक्षण संस्था समूहाचा ४२वा स्थापना दिवस साजरा
यावेळी एमआयटी वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटीचे संस्थापक अध्यक्ष विश्वधर्मी प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड, एमआयटी एडीटी विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डॉ. मंगेश तु. कराड, ज्येष्ठ संपादक बाळासाहेब बडवे, डॉ. विनायक घैसास, डॉ. संजय उपाध्ये, अधिष्ठाता  प्रा. शरदचंद्र दराडे पाटील व एमआयटी डब्ल्यूपीयूचे कुलगुरू डॉ. आर.एम. चिटणीस उपस्थित होते.
उल्हास पवार म्हणाले, “ महाराष्ट्रात तंत्र शिक्षणाचे दालन उघडणारे वसंतदादा यांनी आमुलाग्र क्रांती घडविली आहे. त्यांची इच्छा आणि प्रामाणिता ही अत्यंत महत्वाची होती. त्याच आधारे एमआयटीने आपला विस्तार वाढवून आकाशाला गवसणी घालत आहे.”
प्रा.डॉ. विश्वनाथ दा. कराड म्हणाले, संस्थेत जगभरातील विद्यार्थ्यांनी दाखला घ्यावा अस संकल्प घेऊन त्या दिशेने सर्वांनी कार्य करावे. शिक्षकांच्या निरलस कार्यामुळे ५ खोल्यांतून सुरू केलेल्या संस्थेचा आज मोठा वटवृक्ष झाला आहे. संस्थेची ५ विद्यापीठे आणि विश्वशांतीचा नारा देणारा जगातील सर्वात मोठ्या घुमटाची निर्मिती झाली.”
बाळासाहेब बडवे म्हणाले, “भारतीय संस्कृतीला वरदान ठरलेले माईर्स एमआयटी शिक्षण संस्था अर्ध्या अधिक विश्वात परिचित झालेली आहे. अध्यात्माच्या वृक्षछायेत वाढणारी ही संस्था आता विश्वात साकार होण्यास तयार आहे.”
डॉ. मंगेश तु. कराड म्हणाले, “एमआयटी एक ब्रॅन्ड असून कमी पडतो ते राष्ट्रीय स्तरावर. अशा वेळेस शिक्षणबरोबरच नवीन ज्ञान देण्यासाठी कार्य करावे. आता नवे प्रयोग, नवे पेपर, पेटेन्ट आणि भारतीय अर्थव्यवस्थेला किती हातभार लावू शकतो यावर लक्ष केंद्रीत करावे. तसेच प्रत्येकात पॅशन, कठोर परिश्रम, मनोबल आणि समर्पणाची भावना असावी.”
डॉ. संजय उपाध्ये म्हणाले, “संस्थेच्या विकासासाठी कर्मचार्‍यानी हेवे दावे बाजूला ठेऊन विकासासाठी कार्य करावे. प्रत्येकामध्ये स्कील असते त्याचा उपयोग प्रगतीसाठी करावा. प्रत्येकाने माय संस्था ही भावना सतत मनात ठेवावी.”
यानंतर डॉ. विनायक घैसास यांनी विचार मांडले.
माईर्स एमआयटीच्या ४२व्या स्थापनादिनाचे औचित्य साधून संस्थेच्या वाटचालीत महत्वाचे योगदान देणार्‍या ११ कर्मचार्‍यांचा व संस्थेत १४ वर्षे अविरत सेवा देणार्‍या  ३ कर्मचार्‍यांचा विशेष गौरव करण्यात आला. यामध्ये दिलीप पाटील, गणेश कराड पाटील व राजू उगलमुगले यांचा विशेष पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तसेच विश्वंभर गदले (डब्ल्यूपीयू, पुणे), पद्माकर फड (एडीटी, लोणी काळभोर ), विशाखा कुलकर्णी (आळंदी), हेमंत शिंदे (तळेगाव), राहुल जोशी (बार्शी), गौरव मगर (आळंदी), अनिरुद्ध भातलवंडे (लातूर), दत्तात्रय स्वामी (सरस्वती विद्यालय), भालचंद्र लवाटे (लातूर), सुनीता भोसले (शारदा प्राथमिक विद्यालय), कल्याण साखरे (लोणी काळभोर) यांचा सन्मान करण्यात आला.
यावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष राहुल विश्वनाथ कराड यांनी संदेशातून आपल्या शुभेच्छा दिल्यात.
एमआयटी डब्ल्यूपीयूचे प्र कुलगुरू डॉ. मिलिंद पांडे यांनी प्रास्ताविक केले.
 प्रा. अतुल कुलकर्णी व प्रा. शालिनी टोणपे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. आर.एम.चिटणीस यांनी आभार मानले.

मानवी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिक्षण महत्वाचे-उल्हास पवार
मानवी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी शिक्षण महत्वाचे-उल्हास पवार