Daily UpdateNEWS

बोलबच्चन खासदारामुळे शिरूर मधील प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आढळराव पाटील

Share Post

राज्यात लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत सलेल्या मतदारसंघात महावीकस आघाडी आणि महायुतीच्या उमेदवारांचा जोमाने प्रचार सुरू असल्याचे दिसत आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे हवेली तालुक्यात गावभेट दौरे सुरू असून त्याला  गावकऱ्यांचा जोरदार प्रतिसाद मिळत असल्याचे दिसते.  कोरोना काळात जनतेसाठी स्वतःची पर्वा केली नाही. मतदारसंघातील नागरिकांना आधार देण्यासाठी फिल्डवर काम करत राहिलो. माझ्या काळातले जे ड्रिम प्रकल्प रखडले, काही अपूर्ण राहिले ते पूर्ण करायचे आहेत. यासाठी पुन्हा एकदा माझ्यासाठी आपले पाठबळ द्या, असे आवाहन शिरुरचे महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी  केले.बोलबच्चन खासदारामुळे शिरूर मधील प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आढळराव पाटील

शिरूर लोकसभा मतदारसंघातील नायगाव (ता. हवेली) येथे  गावभेट दौऱ्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप कंद, सुभाष जगताप, माजी पंचायत समितीचे सदस्य बाळासाहेब चौधरी यांच्यासह  महायुतीमधील घटक पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना आढळराव पाटील म्हणाले,  बोलबच्चन खासदारामुळे, मतदारसंघातले प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आहेत. त्यांनी केवळ भाषणबाजी केली. मतदारासंघात कधी फिरकले नाहीत. कोणाचे फोन घेतले नाहीत. निवडणूक आल्यावर शेतकऱ्यांचा कळवळा आल्याचे दाखवत आहेत. मात्र हा माणूस कामाचा नाही, अशी टीका त्यांनी डॉ. अमोल  कोल्हेंवर केली.

प्रदीप कंद म्हणाले, छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका केलेल्या व्यक्तीला आपण मागील वेळी निवडून दिले. परंतु त्या व्यक्तीने कुठलीही कामे केली नाहीत. त्याचे परिणाम आज मतदार संघातील जनता भोगते आहे. या ऊलट आपल्याला ११ कोटी रुपयांचा निधी हा आढळरावांच्या प्रयत्नामुळे मिळाला आहे.

बोलबच्चन खासदारामुळे शिरूर मधील प्रश्न 'जैसे थे' राहिले आढळराव पाटील
बोलबच्चन खासदारामुळे शिरूर मधील प्रश्न ‘जैसे थे’ राहिले आढळराव पाटील