कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
पुणे स्काऊट ग्राउंड येथील हॉल मध्ये समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. साधारण 40 ते 45 विद्यार्थिनी लाभ घेतला.आजचा हा कार्यक्रम संस्थेचे अध्यक्ष श्री संतोष कृष्णा मोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. कोकणवासीय मराठा समाज पुणे व पिपरी चिंचवडच्या वतीने विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप
या कार्यक्रमाला समाजातील जेष्ठ मार्गदर्शक श्री दिनेश जाधव, श्री रघुनाथ शिंदे, श्री कृष्णा मोरे, श्री तानाजी शिंदे, श्री मधुकर मोरे, श्री वसंत चव्हाण व इतर समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच आजच्या कार्यक्रमास संस्थेचे उपाध्यक्ष श्री दत्ता जाधव, श्री अनिल मोरे तसेच सर्व पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष, संपर्कप्रमुख आणि सभासद उपस्थित होते. सर्वानी ह्या कार्यक्रमाचे उत्तम नियोजन करून यशस्वी पणे पार पाडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संस्थेचे मुख्य समन्वयक श्री कृष्णा कदम व श्री रमेश मोरे यांनी केले.