आढळरावांना विजयी करा दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना निरोप
महायुतीतील अजित पवार गटातील बारामती, रायगड आणि धाराशिव लोकसभा मतदारसंघात मतदान पार पडत आहे. अशातच हे सर्व झाल्यानंतर अजित पवार गट आता आपला मोर्चा शिरूरकडे वळविणार आहेत. अशातच महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी आता अजित पवार गट चांगलाच कामाला लागला आहे. अशातच शिरूरमध्ये दिलीप वळसे पाटील हे देखील सक्रीय झाले असून त्यांनी देखील मतदारांना आढळरावांना विजयी करण्याचे आवाहन केले आहे. अशातच दिलीप वळसे पाटील यांची कन्या पुर्वा वळसे पाटलांनी देखील वळसे पाटलांना निरोप घेऊन घड्याळाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.आढळरावांना विजयी करा दिलीप वळसेंचा कार्यकर्त्यांना निरोप
यावेळी पुर्वी वळसे पाटील म्हणाल्या की, आपण विचारपण करू शकत नाही की, सुरूवातीचे तीस वर्ष आपली मुलं परदेशी शकतील, तिकडे राहतील अन् व्यवसाय करून स्वत: च्या पायावर उभी राहतील. मला नाही वाटत की माझ्याही वडिलांनी किंवा माझ्याही आजोबांनी असा कधी विचार केला नव्हता की त्यांच्या घरातलं कोणी कधी परदेशी जाऊ शकेल, परंतु आता सगळं काही शक्य झालं आहे.
गेल्या तीस वर्षात आपल्या मागास भागात जो विकास झाला आहे. जी विकासाची गती आली आहे. त्याच्यासाठी आपल्याकडे दुरदृष्टी ठेवणारे नेते आपल्याकडे आहेत. त्यात वळसे पाटलांचा सिंहाचा वाटा राहिला आहे. अशातच वळसे पाटील आणि आढळराव साहेबांचा तुम्ही सैनिक आहात. त्यामुळे वळसे पाटील साहेबांचा आपल्या सगळ्यांसाठी हा निरोप आहे. की येत्या १३ मे ला घड्याळ्याच्या समोर बटन दाबून शिवाजीराव आढळराव पाटलांना भरघोस मतांनी विजयी करून द्यायचा आहे. असे आवाहन देखील पुर्वा वळसे पाटीलांनी महायुतीच्या कार्यकर्त्यांना केले.
दरम्यान, दिलीप वळसे पाटील यांनी देखील शिवाजीराव आढळराव पाटील यांना प्रचंड बहुमताने विजयी करण्याचे आवाहन केले आहे.
