भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी मतदाराच उत्सुक – धीरज घाटे
भारतीय जनता पक्ष हा दोन खासदारांपासून, ३०० पेक्षा जास्त खासदार निवडून आणणारा पक्ष आहे. हे साध्य करण्यासाठी भाजपने कधीही कोणतेही षडयंत्र केले नाही केवळ कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर आणि मतदारांचा विश्वास मिळवत हे साध्य करून दाखवले आहे, हा इतिहास फार जुना नाही. देशातील मतदारच भारतीय जनता पार्टीला तिसऱ्यांदा विजयी करण्यासाठी व नरेंद्र मोदी यांना पंतप्रधानपदी पाहण्यासाठी उत्सुक आहे. सर्वच गोष्टी जर भारतीय जनता पार्टीच्या बाजूने असतील, तर विजयासाठी पुण्यात भारतीय जनता पार्टीला षडयंत्र करण्याची गरज नाही हे सामान्य मतदाराही समजते. उलट काहीही करा पण निवडणूक जिंकून सत्ता काबीज करा, हे अलिखित आणि अघोषिक धोरण गेली ६०-७० वर्षे देशात राबवणाऱ्या काँग्रेसचे चरित्र षडयंत्र रचण्याचेच आहे, असा घणाघात भारतीय जनता पार्टीचे पुण्याचे अध्यक्ष धीरज घाटे यांनी केला आहे.भारतीय जनता पार्टीच्या विजयासाठी मतदाराच उत्सुक – धीरज घाटे
एमआयएम पक्षाची पुण्यात अनिस सुंडके यांना उमेदवारी मिळणे हे पराभवाच्या भीतीपोटी भाजपाचे पडद्यामागील षडयंत्र असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस ऍड. अभय छाजेड यांनी पत्रकाव्दारे केला आहे. त्या आरोपांचा समाचार भारतीय जनता पार्टीचे पुणे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी सुस्पष्ट शब्दात घेतला. ते म्हणाले, ‘गेली दहा वर्षे काँग्रेस सत्तेच्या बाहेर असल्याने त्यांना येनकेनप्रकारे त्यांना सत्ता हवी असल्याने त्यासाठी ते षडयंत्र रचण्याची शक्यता नाकारती येत नाही. पुण्यातील मतदारांनी २०१४ आणि २०१९ साली मोदीजींसाठी कसे मतदान केले याचा इतिहास सर्वांना माहीत आहे. यावेळीही मतदारांनी त्यांचे मन बनवले असून आता पुण्यातील नाही तर देशातील मतदार नरेंद्र मोदीजींना पुन्हा तिस-यांचा पंतप्रधान करण्यासाठी उत्सुक असल्याचे चित्र दिसत आहे.
धीरज घाटे यांनी सांगितले की, ‘अन्य पक्षातून काँग्रेसमध्ये केवळ तिकीटासाठी आलेल्या रविंद्र धंगेकरांना काँग्रेसने काही महिन्यापूर्वी कसबा विधानसभेच्या पोटनिवडणुकीत उमेदवारी दिली. आता पुन्हा त्यांनाच लोकसभेसाठी उमेदवारी दिली असल्याने धंगेकरांना उमेदवारीवरुन कार्यकर्त्यांच्यातील मोठा वर्ग नाराज आहे. ही नाराजी व्यक्त करण्याचा एक भाग म्हणून भाजपसारख्या पक्षावर षडयंत्राचे आरोप केले जात आहेत.
राहता राहिला एमआयएम ही भारतीय जनता पार्टीची B टीम असल्याचा दावा, तो दावा किती पोकळ आहे, हे वारंवार सिद्ध झाले आहे. निवडणूक आयोगाने हैद्राबादमधील ५ लाख ४० हजार बोगस मतदारांची नावे काढून टाकली आहेत. तसेच हैद्राबादमध्ये मोठ्या संख्येने बोगसमतदार असल्याचा आरोपच तेथील भाजपच्या उमेदवार माधवी लता यांनी जाहीरपणे केला होता. जर एमआयएम ही भाजपची बी टीम असती तर भाजपचे त्यांचे नुकसान ऐन निवडणुकीत केले असते का’
ज्या काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात शपथेवर श्रीराम काल्पनिक असल्याचे सांगितले होते, त्याच काँग्रेसच्या सर्व नेत्यांवर रामनवमीच्या शुभेच्या देऊन पत्रकार परिषद सुरू करण्याची वेळ का आली ? आमची सत्ता राज्यात १९९५ साली आली पण नंतर पंधरा वर्षे नाही आली. जेव्हा काँग्रेसच्या कारभाराला लोक कंटाळले आणि त्यांनी २०१४ साली भाजपला सत्तेवर बसवले. जे राज्यात तेच केंद्रात, स्व. अटल बिहारी बाजपेयींचे सरकार २००४ साली गेल्यानंतर काँग्रेसची सत्ता देशात आली, पण अवघ्या दहाच वर्षात देशातील जनतेने बहुमताने भारतीय जनता पार्टीला केंद्रात सत्ता दिली. त्यासाठी कोणतेही षडयंत्र करावे लागले नाही, कारण ते भारतीय जनता पार्टीचे चरित्रच नाही, असेही घाटे यांनी स्पष्ट केले.