पुढील 25 वर्षांचा विचार करून कसब्याचा विकास – रासने
शहराचे ‘हार्ट ऑफ द सिटी’ म्हणून कसबा मतदारसंघाची ओळख आहे. मुख्य बाजारपेठेला जोडणारे बाजीराव रस्ता आणि शिवाजी रस्ता हे दोन महत्त्वाचे रस्ते आहेत. दाट लोकवस्तीमुळे गेल्या अनेक वर्षांपासून हे रस्ते विस्तारलेले नसून वाहनांची संख्या वाढल्याने या भागातील कोंडी प्रचंड वाढली आहे. त्यामुळे अतिक्रमण मुक्त आणि प्रशस्त असे मॉडर्न रस्ते करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी भूमिका कसबा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार हेमंत रासने यांनी मांडली आहे.पुढील 25 वर्षांचा विचार करून कसब्याचा विकास – रासने
शुक्रवार पेठ परिसरात रासने यांच्या प्रचारफेरीला नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. भाऊसाहेब रंगारी गणपती, मेट्रो स्टेशन, आंग्रेवाडा, अकरा मारुती चौक, चिंचेची तालीम, छत्रपती शिवाजी महाराज रस्ता, सुभाषनगर, अत्रे सभागृह भागात प्रचारफेरी काढण्यात आली होती. यावेळी परिसरातील माता भगिनींनी औक्षण करत रासने यांना विजयासाठी शुभेच्छा दिल्या.
दरम्यान, शहराचा मध्यवर्ती भाग आणि मोठी बाजारपेठ असल्याने हा परिसर कायम गजबजलेला असतो. त्यामुळे रस्त्यावर नवीन ड्रेनेज आणि पाण्याची लाईन टाकता आलेली नव्हती. त्यामुळे आम्ही पुढील 25 वर्षांचा विचार करत भूमिगत ड्रेनेज लाइन आणि जलवाहिन्या टाकण्यात आल्या असल्याचं देखील रासने म्हणाले.
प्रचारफेरीत अशोक येनपुरे, रूपाली ठोंबरे पाटील, स्वरदा बापट, उज्ज्वला गंजीवाले, दिलीप काळोखे, सोहम भोसले, दिलीप पवार, अनिल बेलकर, अशोक कदम, प्रणव गंजीवाले, शेखर बोफ्लडकर, पंकज मोने, नंदकुमार जाधव, अनिल पवार, मुकेश राजावत, विजय नाईक, अनिल तेलवडे, राजू ठिगळे उपस्थित होते.