शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळसच-बावनकुळे
शरद पवारांना सीतामाईंबद्दल कळवळा येणे म्हणजे ढोंगीपणाचा कळसच भारतीय जनता पार्टीचे चंद्रशेखर बावनकुळे यांचा शरद पवारांवर घणाघात घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना सीतामाईंबद्दल कळवळा कसा?
राम मंदिरात बालरूपातील रामजी विराजमान आहेत, याची आधी त्यांनी माहिती घ्यावी
राम मंदिरप्रश्नी बावनकुळे यांचा शरद पवारांना सल्ला.
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे शरद पवार यांनी नुकतेच राम मंदिराच्या बाबत एक वक्तव्य केले होते.
ते म्हणाले राम मंदिराबाबत सर्वजण बोलतायत, पण सीतेच्या मुर्तीबाबत का बोलत नाही, अशी नाराजी महिलांनी व्यक्त केली असे शरद पवार म्हटले. आता यावरुन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.
राम मंदिरात सीतामाईची मूर्ती का नाही? असा जावईशोध शरद पवार यांनी लावला आहे. एरवी हेच पवार मंदिराच्या प्रश्नावर नाक मुरडत आपण नास्तिक असल्याची शेखी मिरवत असतात, अशी तिखट टीका बावनकुळेंनी शरद पवारांवर केली आहे
ढे बोलताना ते म्हणाले, शरद पवारांनी उचलली जीभ आणि लावली टाळ्याला असं करण्यापूर्वी राम मंदिराची थोडी माहिती घ्यायला हवी होती. असे ते म्हणाले.
राम मंदिरात बालरूपातील रामलल्ला विराजमान आहेत.
शरद पवारांना फक्त राजकारण करण्यात रस आहे. शरद पवार निवडणुकीसाठी घरात आलेल्या सुनेला बाहेरची म्हणून हिणवतात त्यांना आज सीतामाईंबद्दल कळवळा येणे हा ढोंगीपणाचा कळसच म्हणावा लागेल, असा घणाघातही त्यांनी यावेळी केला.