चंद्रकांत पाटलांसाठी भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला
राज्यात विधानसभा निवडणुकीसाठी प्रचाराला आता काही दिवस शिल्लक राहिले आहेत. येत्या २० तारखेला मतदान होणार असल्याने उमेदवारांकडे आता चारच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे उमेदवारांनीही आता प्रचारात वेग घेत जास्तीत जास्त मतदारांजवळ पोहचण्याचा प्रयत्न करतांना दिसत आहेत. अशातच आता कोथरूड विधानसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी भाजपचे कार्यकर्ते चांगलचे सक्रीय झाले असून मतदारसंघात जोरदार काम करतांना दिसत आहेत.चंद्रकांत पाटलांसाठी भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला
अलिकडेच पुण्यातील महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा पार पडली. यातच कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटील यांच्यासाठी महायुतीच्या अनेक नेत्यांनीही सभा घेतली. याचसोबत आता भाजपची दुसरी फळी देखील चंद्रकांतदादा पाटलांसाठी मैदानात उतरली आहे. अशातच भाजप शहर चिटणीस आणि कोथरूड विधानसभा उत्तर मंडलचे संयोजक लहू बालवडकर देखील प्रत्यक्षात मैदानात उतरले आहेत.चंद्रकांत पाटलांसाठी भाजपचे कार्यकर्ते लागले कामाला
लहू बालवडकर यांनी यांनी आज लहू बालवडकर सोशल वेल्फेअर आयोजित श्री स्वामी समर्थ शेतकरी आठवडे बाजार येथे चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रचारार्थ पत्रके आणि विक्रमी १९८७ मतदान स्लीप वाटल्या. तसेच चंद्रकांतदादा पाटील यांना दोन नंबरच्या समोर ‘कमळ’ बटन दाबून प्रचंड बहुमताने विजयी करा, असे आवाहन देखील लहू बालवडकर यांनी मतदारांना केले आहे. याआधीही बालेवाडी येथे प्रबोधन मंच आणि लहू बालवडकर सोशल वेल्फेअर संस्थेच्या वतीने १०० टक्के मतदान, देशासाठी मतदान या उद्देशाने नागरिकांमध्ये जागरूकता वाढवण्याचा उपक्रम राबवला. त्यालाही नागरिकांनी उत्सुर्फ प्रतिसाद दिला.
दरम्यान, कोथरूडमध्ये चंद्रकांतदादा पाटलांनी प्रचारात चांगलीच आघाडी घेतली आहे. आतापर्यंत त्यांनी मतदारंसघात रॅली, सभा, बैठकांच्या माध्यमातून मतदारसंघातील जवळपास सगळ्याच मतदारांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न केला आहे. तर त्यांच्यासाठी महायुतीचे नेते देखील चांगलेच कामाला लागले आहेत. त्यामुळे येत्या २३ तारखेला कोथरूडमधून चंद्रकांत पाटील पुन्हा गुलाल उधळणार का ? अशी चर्चा मतदारसंघात सुरू झाली आहे.