एका वेगळ्या विषयावर भाष्य करणारा ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच चित्रपटगृहात प्रदर्शित होईल. आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर आधारित हा पहिलाच मराठी चित्रपट असणार असून नुकतीच या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. बियु प्रॉडक्शन निर्मित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’चे पुष्कर सुरेखा जोग दिग्दर्शक आहेत.पुष्कर जोग यांनी मराठी सिनेसृष्टीला वेगवेगळे हटके विषय दिले आहे.Artificial intelligenceवर आधारित ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ लवकरच
त्यांचा प्रत्येक चित्रपट हा नाविन्यपूर्ण असतो, त्यामुळे या चित्रपटाच्या माध्यमातूनही प्रेक्षकांना नक्कीच काहीतरी भन्नाट पाहायला मिळेल. या चित्रपटाच्या तेजल पिंपळे निर्मात्या आहेत. तर पुष्कर सुरेखा जोग, दीप्ती लेले आणि स्मिता गोंदकर यात मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.
आतापर्यंत आपण AI टेक्नॉलॉजी आपण फक्त Social Media आणि इतर वेगवेगळ्या Gaming प्लॅटफॉर्मवर पाहिली होती. आता हाच विषय मराठी चित्रपटात पाहायला मिळणार असल्याने ‘धर्मा- दि एआय स्टोरी’ विषयीची उत्सुकता वाढलेली दिसत आहे.
सिनेमाबद्दल दिग्दर्शक पुष्कर जोग म्हणाले,” मराठी मनोरंजन विश्वात हा प्रयोग पहिल्यादांच होत आहे. या चित्रपटाचा विषय नवीन असून यामध्ये अनेक नवनवीन गोष्टी पाहायला मिळतील. हा विषय एआयवर आधारित आहे.
कसा AI टेक्नॉलॉजीचा वापर करून वैयक्तिक सूड उगवण्याचा प्रयत्न करत एका बापाच्या मुलीचे अपहरण केले जाते. धर्म मुक्तीच्या धोकादायक प्रवासाला निघालेल्या या बापाची कहाणी यात पाहायला मिळणार आहे. सिनेमाच्या चित्रीकरणाची सुरुवात सुरू झाली असून सप्टेंबर महिन्यात हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
More Stories
बॉलीवूड स्टार विकी कौशलनच्या हस्ते पुण्यात कल्याण ज्वेलर्सच्या नवीन शोरूमचे उद्घाटन
Maestro Realtek excelled as Menlo Developer strategic partner for Codename Frontyard premium NA villa plotted project
The Rise of Pune: Factors Driving the Real Estate Boom