अँप्रिलिया इंडियाकडून ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जॉन अब्राहम यांची घोषणा
अँप्रिलिया या उच्च-कार्यक्षम मोटरसायकल्सच्या प्रख्यात उत्पादक कंपनीने ब्रँडसाठी उत्साहवर्धक पोर्टफोलिओचे नेतृत्व करण्यासाठी भारतातील ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जॉन अब्राहम यांची घोषणा केली आहे. स्वतः मोटरसायकलप्रेमी असलेले जॉन अब्राहम देशामध्ये सुपरबाइक संस्कृतीला उत्तमरित्या दर्शवतात. अँप्रिलियाने भारतातील बाजारपेठेसाठी अधिकृतरित्या आपला व्यापक सुपरबाइक पोर्टफोलिओ आरएसव्ही४ फॅक्टरी, आरएस६६०, ट्यूनो ६६० आणि ट्यूआरेग ६६० लाँच केला, जो देशातील सुपरबाइकप्रेमींसाठी मोठा क्षण ठरला. या सर्व सुपरबाइक्स भारतभरातील अँप्रिलिया मोटोप्लेक्स डिलरशिप्सच्या माध्यमातून कम्प्लीटली बिल्ट-अप युनिट्स (सीबीयू) म्हणून उपलब्ध आहेत.अँप्रिलिया इंडियाकडून ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून जॉन अब्राहम यांची घोषणा
अँप्रिलिया इंडियाला त्यांचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून समर्पित अँप्रिलिया चाहते जॉन अब्राह्म यांचे स्वागत करताना अभिमान वाटत आहे. जॉन अब्राहम यांच्यासोबतचा हा सहयोग अत्यंत उत्साहवर्धक आहे. अब्राह्म यांची उच्च-कार्यक्षम मोटरसायकल्सप्रती आवड अॅप्रिलियाचा रेसिंग हेरिटेज व वारसाशी परिपूर्णपणे संलग्न आहे. ते भारतातील बाइकिंगची आवड असलेल्या संपन्न समुदायांशी संलग्न आहेत. ते ब्रँड अॅम्बेसेडर असण्यासोबत निस्सीम चाहते, राइडर देखील आहेत, ज्यामधून अॅप्रिलियाचा उत्साह दिसून येतो.
अँप्रिलिया इंडियाच्या कार्यक्षम पोर्टफोलिओचे अनावरण करताना जॉन अब्राहम म्हणाले, “मला अॅप्रिलियासोबत त्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून सह्योग करण्याचा आनंद होत आहे. मी स्वतः अॅप्रिलिया ब्रँडशी संलग्न आहे, जो आवड, कार्यक्षममता व स्टाइलचे प्रतीक आहे. मला असा प्रशंसनीय वारसा असलेल्या ब्रँडचा भाग असण्याचे सन्माननीय वाटते. मी अँप्रिलियाच्या प्रवासाचा भाग असण्यास उत्सुक आहे, जेथे हा ब्रँड उच्च-कार्यक्षम बाइक्ससाठी ओळखला जातो, ज्यामधून स्पोर्ट, रेसिंग व साह्याचा उत्साह दिसून येतो.”
पियाजिओ वेईकल्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. डिएगो ग्राफी म्हणाले, “आम्हाला अँप्रिला कुटुंबामध्ये जॉन अब्राह्म यांचे स्वागत करताना खूप आनंद होत आहे. जॉन यांची कार्यक्षमता, साहस व सर्वोत्तमतेप्रती आवड अँप्रिलियाच्या उत्साहाशी परिपूर्ण संलग्न आहे. हा सहयोग निश्चितच आमच्या ब्रँड दृष्टिकोनाला प्रबळ करेल आणि थरारक राइड अनुभव देण्यासह स्टायलिश दिसणाऱ्या मोटरसायकलची आवड असलेल्या प्रत्येक राइडरशी संलग्न होईल.”
कॉर्पोरेट कम्युनिकेशन अँड मार्केटिंगचे प्रमुख श्री. अपूर्व सैगल म्हणाले, “अँप्रिलियाचे ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून जॉन अब्राह्म यांची नियुक्ती आमच्या ब्रेड प्रवासामधील मोठे संपादन आहे. जॉन यांना मोटरसायकलिंगप्रती असलेली आवड आमच्या सूक्ष्मदर्शी ग्राहकांना प्रभावित करते आणि जॉन यांचा जनतेमधील प्रभाव अॅप्रिलियाची पोहोच वाढवण्यामध्ये, तसेच अधिकाधिक उत्साहित राइडर्सशी कनेक्ट करण्यामध्ये साह्यभूत ठरेल. सह्योगाने, आम्ही अँप्रिलिया मोटरसायकल राइड करण्याच्या रोमांचला प्रशंसित करणाऱ्या मोहिमा डिझाइन करण्यास उत्सुक आहोत.”