एंजेल ग्रुपची इलेक्ट्रॉनिका प्लॅस्टिक मशिन्स कंपनीशी धोरणात्मक भागीदारी भारतीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती
युरोपमधील इंजेक्शन मोल्डिंग तंत्रज्ञानाचा अग्रगण्य पुरवठादार असलेल्या एंजेल ग्रुपने भारतातील हायड्रोलिक इंजेक्शन मोल्डिंग मशीनची आघाडीची उत्पादक कंपनी इलेक्ट्रॉनिका प्लॅस्टिक मशीन्सशी (EPM) धोरणात्मक भागीदारी करून भारतीय बाजारपेठेत आपली उपस्थिती मजबूत केली आहे. एंजेल ग्रुपने इलेक्ट्रॉनिका प्लॅस्टिक मशीन्स (EPM) कंपनीतील हिस्सा खरेदी केला असून, आता ईपीएम कंपनी एंजेल ग्रुपचा भाग बनली आहे.एंजेल ग्रुपची इलेक्ट्रॉनिका प्लॅस्टिक मशिन्स कंपनीशी धोरणात्मक भागीदारी भारतीय बाजारपेठेत मजबूत उपस्थिती
ईपीएम ही भारतीय प्लास्टिक मशिनरी उद्योगातील आघाडीची कंपनी असून, ती ३० वर्षांहून अधिक काळ या व्यवसायात आहे. हा एक कौटुंबिक व्यवसाय असून, आता दुसरी पिढी या व्यवसायाची धुरा पुढे नेत आहे. कौटुंबिक मालकी, शाश्वत व्यवसाय पद्धती आणि ग्राहक प्रथम दृष्टिकोन यावर एंजेल आणि ईपीएम दोन्ही कंपन्या भर देतात. त्यांच्यातील ही एकसारखी मानसिकता त्यांच्या भागीदारीचा मजबूत पाया प्रदान करते.
स्थानिक उत्पादन आणि नावीन्यपूर्ण कल्पना
दोन्ही कंपन्यांमधील हे सहकार्य स्थानिक उत्पादन विशेषतः मेक इन इंडिया उपक्रमाद्वारे उत्पादन आणि नावीन्यपूर्ण कल्पना मजबूत करण्यावर लक्ष केंद्रित करते. पुण्यातील ईपीएमची उत्पादन सुविधा भारतीय बाजारपेठेच्या विशिष्ट गरजांनुसार प्रगत इंजेक्शन मोल्डिंग मशीनच्या निर्मितीसाठी केंद्र म्हणून काम करेल. याव्यतिरिक्त, या भागीदारीमुळे मध्य पूर्व आणि आफ्रिकेसारख्या प्रदेशांमध्ये भारतीय-निर्मित मशीन्स निर्यात करण्याच्या संधी उपलब्ध होतील.
ग्राहक फायदेः प्रगत तंत्रज्ञान आणि स्थानिक पातळीवर सेवा
या भागीदारीमुळे एंजेलच्या ग्राहकांना प्रगत तंत्रज्ञान, बाजारपेठ-विशिष्ट गरजा पूर्ण करण्यासाठी डिझाइन केलेली स्थानिक पातळीवर उत्पादित मशीन्स आणि सुधारित विक्री-पश्चात सेवेचे आश्वासन देते. ईपीएमच्या स्थानिक उपस्थिती आणि एंजेलचे जागतिक कौशल्य ग्राहकांना जलद सेवा, स्पर्धात्मक किंमत आणि विस्तारित उत्पादन पोर्टफोलिओ यांचा फायदा देईल.
सातत्य आणि वाढः
ईपीएमचे व्यवस्थापकीय संचालक आदित्य रत्नपारखी हेच यापुढेही व्यवस्थापकीय संचालक म्हणून कंपनीचे नेतृत्व करत राहतील. एंजेल समूह ईपीएमचे स्वातंत्र्य आणि बाजारपेठेतील प्रतिष्ठा राखून, जागतिक नेटवर्क आणि तांत्रिक कौशल्यांची संधी देईल.
मेक इन इंडिया मोहिमेच्या माध्यमातून भारताने देशात उत्पादन वाढवण्यावर आणि शाश्वत पद्धतीवर भर दिला आहे, त्यामुळे इंजेक्शन मोल्डिंग उद्योगात नावीन्यपूर्णतेला आणि स्थानिक उत्पादन वाढीसही चालनामिळेल. हे उद्योग क्षेत्र २०२४ ते २०३० दरम्यान वार्षिक ६ टक्क्यानी वाढेल, अशी अपेक्षा आहे. अशा भागीदारींमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उपाययोजनांचा लाभ घेण्याची संधी मिळेल.
एंजेल ग्रुपचे सीईओ डॉ. स्टीफन एंग्लडर म्हणाले, “ईपीएमची मजबूत ओळख जपून त्यांच्या वाढीला पाठिंबा देणे हे आमचे ध्येय आहे. आम्ही सामायिक मूल्ये आणि शाश्वत व दीर्घकालीन यशासाठी वचनबद्ध आहोत.”
आदित्य रत्नपारखी यांनीही ही भागीदारी ईपीएमसाठी एक मैलाचा दगड असल्याची भावना व्यक्त केली. ते म्हणाले,” एंजेलसोबतची आमची भागीदारी हा आमच्या प्रवासातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा आहे. इंजेलचे अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि आमचे कौशल्य एकत्रित करून, आम्ही आमच्या ग्राहकांच्या गरजा पूर्ण करणारे उत्कृष्ट इंजेक्शन मोल्डिंग सोल्युशन्स वितरीत करण्यास तयार आहोत. हे सहकार्य आम्हाला केवळ उद्योग मानकांमध्ये नवे मापदंड निर्माण करण्यास सक्षम करत नाही तर अचूकता, कार्यक्षमता आणि विश्वासार्हतेमध्ये उत्कृष्ट राहण्यासाठीदेखील सक्षम करते. या भागीदारीमुळे आम्हाला ईपीएमचा वारसा पुढे चालू ठेवत एंजेलच्या सामर्थ्याचा लाभ घेण्याची संधी मिळणार आहे. ही महत्त्वाची बाब आहे.”
ही भागीदारी एंजेलची प्रादेशिक उपस्थिती भक्कम करण्यासाठी आणि स्थानिक बाजारपेठांसाठी अनुकूल उपाय विकसित करण्याच्या धोरणातील एक महत्त्वपूर्ण पाऊल दर्शवते. सामायिक दृष्टी आणि पूरक बलस्थानांसह एंजेल आणि ईपीएम शाश्वत वाढ आणि नावीन्यपूर्णतेसाठी सज्ज झाले आहेत.
एंजेल ऑस्ट्रिया जीएमबीएचः
इंजेक्शन मोल्डिंग मशिनच्या निर्मितीमध्ये एंजेल ग्रुप ही जागतिक पातळीवरील आघाडीची कंपनी आहे. प्लास्टिक प्रक्रियेसाठी तंत्रज्ञान मॉड्यूल्सची ऑटोमेशनसह थर्मोप्लास्टिक्स आणि इलास्टोमर्ससाठी इंजेक्शन मोल्डिंग मशीन अशी संपूर्ण श्रेणी पुरवणारी ही एकमेव कंपनी आहे. युरोप, उत्तर अमेरिका आणि आशिया (चीन आणि कोरिया) मध्ये नऊ उत्पादन प्रकल्प आणि ८५ हून अधिक देशांमधील उपकंपन्या आणि प्रतिनिधींसह, एंजेल आपल्या ग्राहकांना आधुनिक तंत्रज्ञान आणि आघाडीच्या उत्पादन प्रणालींसह स्पर्धात्मक आणि यशस्वी होण्यासाठी आवश्यक असलेले उत्कृष्ट जागतिक सामर्थ्य प्रदान करते.
इलेक्ट्रॉनिका प्लास्टिक मशीन्स (ईपीएम): इलेक्ट्रॉनिका प्लास्टिक मशीन्स (ईपीएम) ही हायड्रोलिक इंजेक्शन मोल्डिंग मशिन्सची एक आघाडीची भारतीय उत्पादक कंपनी आहे, जी तीन दशकांहून अधिक काळ प्लास्टिक मशिनरी उद्योगाला सेवा देत आहे. पुण्यात मुख्यालय असलेली ईपीएम ही दुसऱ्या पिढीतील कौटुंबिक मालकीची कंपनी आहे. स्थानिक बाजाराच्या गरजेनुसार तयार केलेल्या मजबूत, विश्वासार्ह उत्पादनांसाठी कंपनी ओळखली जाते. गुणवत्तेवर आणि नावीन्यपूर्णतेवर भर देऊन ईपीएमने भारतीय प्लास्टिक उद्योगात विश्वासू भागीदार म्हणून नावलौकिक मिळवला असून, ग्राहकांना अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि उत्कृष्ट सेवेसह पाठिंबा देत आहे.