शिरूर मध्ये अमोल कोल्हेंना उद्देशून गावांच्या वेशीवरचे पोस्टर चर्चेत
लोकसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर शिरूर मध्ये वातावरण आता चांगलेच तापू लागले असल्याचे पाहायला मिळत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने शिवाजीराव आढळराव पाटील Vs शरद पवार गटाचे अमोल कोल्हे अशी लढत होणार आहे. यातच दोन्ही उमेदवारांकडून विविध ठिकाणी प्रचार यंत्रणा राबविण्यात येत आहे.शिरूर मध्ये अमोल कोल्हेंना उद्देशून गावांच्या वेशीवरचे पोस्टर चर्चेत
अभिनेते म्हणून प्रसिद्ध असलेले कोल्हे निवडून आल्यानंतर गेल्या पाच वर्षात अनेक गावांमध्ये गेले नसल्याचा आरोप आढळरावांनी नुकताच केला होता, अशातच वेगवेगळ्या गावच्या वेशींवर “अमोलदादा, तब्बल पाच वर्षानंतर आपले आमच्या गावात सहर्ष स्वागत : आपलाच 2019 चा विश्वासू मतदार” अशा आशयाचे फलक पाहायला मिळत आहे.
अमोल कोल्हे यांच्याबद्दल लागलेल्या बॅनर्स ची चर्चा सध्या शिरूर लोकसभेत सर्वत्र होत असून, गेल्या पाच वर्षात खासदार म्हणून कोल्हेंचा जनसंपर्क कमी असल्याच्या चर्चा अनेक गावांमध्ये आहे, त्याउलट माजी खासदार आढळराव पाटील हे खासदार नसतानाही पाच वर्षात त्यांनी जनसंपर्क चांगला ठेवला. नागरिकांचे प्रश्न समजून त्यांची कामे केली.कोरोना काळातही त्यांनी अनेक गावांमध्ये नागरिकांना मदत पुरवली त्यामुळे गावांतील नागरिकांमध्ये आढाळरावांप्रती सकारात्मक वातावरण निर्माण झाल्याचे पहायला मिळत आहे. आता गावांच्या वेशीवर लागलेल्या खोचक स्वागताच्या बॅनर्स बद्दल अमोल कोल्हे काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.