26/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

कोल्हे कुई आपल्याला आता थांबवायची आहे - प्रवीण दरेकर

कोल्हे कुई आपल्याला आता थांबवायची आहे - प्रवीण दरेकर

कोल्हे कुई आपल्याला आता थांबवायची आहे – प्रवीण दरेकर

Share Post

”ज्यांना आपण केलेली 5 कामेही सांगता येत नाहीत, त्यांची ‘ कोल्हे कुई ‘ आपल्याला आता थांबवायची आहे. अशी टीका करत भाजप नेते आमदार प्रवीण दरेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांच्यावर केली. तसेच हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही. म्हणून नरेंद्र मोदी यांना पुन्हा पंतप्रधान बनवण्यासाठी आपल्याला आपल्या भागातून त्यांच्या विचारांचा खासदार पाठवा, असे आवाहन मतदारांना केले. शिरूर लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांकया प्रचारार्थ आयोजित सभेत दरेकर बोलत होते.कोल्हे कुई आपल्याला आता थांबवायची आहे – प्रवीण दरेकर

पुढे बोलताना प्रवीण दरेकर म्हणाले की, प्रचाराच्या माध्यमातून येथील विरोधक फक्त डायलॉग बाजी करतात, जुनी उणीदुणी काढायचा प्रयत्न करतात. ते फक्त ‘ कोल्हे कुई ‘ करू शकतात. त्यांनी केलेली 5 कामे सुद्धा त्यांना सांगता येणार नाहीत. खासदार हा जनतेसाठी हवा अन् जनतेला विकास हवा असतो. त्यामुळे जनतेला महायुती शिवाय पर्याय नाही.

आज केंद्रात नरेंद्र मोदी आणि राज्यात एकनाथ शिंदे हे भरभरून निधी देणारे नेतृत्व आहे. माढाचे खासदार रणजीत निंबाळकर यांनी तर केंद्रातून रेकॉर्ड ब्रेक निधी आणला आहे . आपल्या भागामध्ये विविध विकास कामे केली आहेत. हे तेव्हाच शक्य होतं, जेव्हा केंद्रामध्ये आपलं नेतृत्व असेल व राज्यामध्ये आपल्या नेतृत्वाचे सरकार असेल. त्यामुळे विरोधी विचारांच्या नेत्याला खासदार म्हणून निवडून देण्यात काय अर्थ आहे? असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांचा हा शेवटचा प्रयोग आहे. नाटकात जसा शेवटचा अंक असतो. पुन्हा त्यांचं नाटक आपल्याकडे आता चालणार नाही. यासाठी प्रेक्षकांनी म्हणजेच जनतेने त्यांच्यावर बहिष्कार टाकायला हवा. त्यांनी पाच वर्ष राजकीय नाटक केला आहे आणि आपला विकास थांबवला. यामुळे आता त्यांना त्यांच्या अभिनय क्षेत्रात परत पाठवण्याची वेळ आली असल्याचाही टोला त्यांनी लगावला.

कोल्हे कुई आपल्याला आता थांबवायची आहे - प्रवीण दरेकर