20/05/2024

smart punekar news

Latest Breaking News in Marathi | Live Updates

निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात - देवेंद्र फडणवीस

निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात - देवेंद्र फडणवीस

निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात – देवेंद्र फडणवीस

Share Post

लोकसभेच्या चौथ्या टप्यात मतदान होत असलेल्या शिरूर मतदार संघात आज प्रचाराची रणधुमाळी थांबणार आहे.  ‘‘पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी पुन्हा विराजमान होतील, तेव्हा शहरातील रेडझोनचा प्रश्न सोडविण्यासाठी संरक्षणमंत्र्यांना प्रसंगी मोदी यांना भेटू आणि सर्व मिळून हा प्रश्न सोडवू. इंद्रायणी नदी प्रदूषणमुक्त करायची आहे. हिंजवडी ते भोसरी-चाकण मेट्रोने जोडणार आहोत. चाकणमधील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी तीन मजली उड्डाण पुलाचे नियोजन आहे. पीएमपीच्या ताफ्यात ई-बसची संख्या वाढवून पर्यावरण पूरक काम करायचे आहे.” यासाठी महायुतीला साथ डया असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भोसरी येथील  सभेत केले. निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात – देवेंद्र फडणवीस

महायुतीचे  शिरूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ भोसरीत आयोजित सभेत फडणवीस बोलत होते. यावेळी शिवाजीराव आढळराव, आमदार महेश लांडगे, अश्विनी जगताप, उमा खापरे, माजी आमदार विलास लांडे, मंगलदास बांदल आदीसह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

फडणवीस म्हणाले, ‘‘बारामती लोकसभा मतदारसंघात मतदान झाले आणि शरद पवार यांना कळून चुकले की, आता आपले काही खरे नाही. आता राजकीय हवा महायुती आणि अजित पवार यांच्या बाजूने वाहू लागली आहे. आपला पराभव निश्चित आहे. म्हणून ते प्रादेशिक पक्षांची काँग्रेसमध्ये विलीनीकरणाची भाषा बोलत आहेत,’’ असा दावाही त्यांनी केला. 

नरेंद्र मोदी आमच्या महायुतीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार आहेत. इंडिया आघाडीकडे असा नेताच नसल्याने ते संगीत खुर्ची खेळतील आणि पाच वर्षांत पाच पंतप्रधान देतील, अशी टीका करत फडणवीस यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्यावरही हल्लाबोल केला. निवडणूक झाल्यानंतर ते नाटके करतात आणि जनतेला विसरतात. ते ‘फ्लॉप’ ठरले आहेत, त्यांना आता पुन्हा संधी द्यायची नाही. कारण ते चांगले कलाकार आहेत. पण, चांगले खासदार होऊ शकले नाहीत, असा टोलाही फडणवीस यांनी लगावला.

निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात - देवेंद्र फडणवीस
निवडणूक झाल्यानंतर कोल्हे नाटके करतात – देवेंद्र फडणवीस