Daily UpdateNEWS

कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आढळराव पाटील

Share Post

शिरूर लोकसभा मतदार संघात चौथ्या टप्यात मतदान होणार आहे, यामुले आज मतदारसंघातील प्रचाराच्या तोफा थंडावणार आहेत.  महावीकस आघाडीचे उमेदवार डॉ. अमोल कोल्हे यांच्याकडे  विकासाचे मुद्दे नाहीत. माझ्या काळात  मंजूर झालेल्या विकासकामांचे श्रेय ते घेत आहे. मात्र, आता १५-१६ गावांनी या उमेदवाराला वेशीवरच अडविले आहे. तर एका गावाने २२ – निवेदन देऊनही त्यावर कार्यवाही न झाल्याबद्दलचा जाब विचारला – आहे. त्यामुळे दिशाभूल करून ते सहानुभूती मिळवत आहेत. असा आरोप महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी केला. 

भोसरी येथे आयोजित विजय संकल्प सभेत आढळराव बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आमदार महेश लांडगे आदि मान्यवर उपस्थित होते.

आढळराव पाटील म्हणाले, शिरूर मतदारसंघासाठी आलेला निधी खर्च न करणारा खासदार आपण पाच वर्षे पाहिला आहे.  खासदार डॉ. अमोल कोल्हे दिल्लीला गेले ते परत मतदारसंघात आले नाहीत. गावभेट दौरा, कोणाला भेट नाही. फोन उचलत नाहीत. ८० टक्के खासदार निधी वापराविना परत गेला. विकासाचा मुद्दा नसल्याने खोटे-नाटे आरोप करत असून दिशाभूल करत आहेत. सहानुभूती मिळविण्यासाठी एकनिष्ट असल्याचे सांगत आहेत.  मात्र प्रत्यक्षात पाच पक्ष बदलेल्या कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही. कोल्हे महागद्दार आहेत. ते आम्हाला निष्ठेच्या गप्पा शिकवत आहेत. मी वीस वर्षे धनुष्यबाणासोबत निष्ठेने राहिलो. महायुतीच्या जागांवाटपंत शिरूरची जागा राष्ट्रवादीला जागा गेल्याने सहमतीचा उमेदवार म्हणून मी घड्याळाच्या चिन्हावर लढत असल्याचा खुलासा आढळराव यांनी केला. तसेच २०१९ मध्ये महेश लांडगे यांचे काम करु नका असे निर्देश तत्कालीन नेतृत्वाने दिले होते, असा दावाही त्यांनी केला.

कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही - आढळराव पाटील
कोल्हेंना निष्ठेबद्दल बोलण्याचा अधिकार नाही – आढळराव पाटील