Daily UpdateNEWS

सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक दुकाने विक्रेत्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी Amazon वचनबद्ध

Share Post

महाराष्ट्रातील आणि भारतभरातील विक्रेत्यांसाठी २०२४ चा सणासुदीचा काळ यशस्वी बनविण्यासाठी Amazon ने विविध उपक्रम आणि नावीन्यपूर्ण कल्पना सादर केल्या आहेत. Amazon ने विक्रेत्यांना त्यांच्या उत्पन्नात वाढ करायला मदत आणि ग्राहकांना अधिक चांगल्या किमतीत वस्तू सादर करता येण्यासाठी किराणा माल, फॅशन आणि इलेक्ट्रॉनिक्स यांसारख्या श्रेणींमध्ये 3% ते 12% दरम्यान विक्री शुल्कात मोठी कपात जाहीर केली आहे. यामुळे विक्रेत्यांना दिवाळीच्या खरेदीच्या धामधुमीत त्यांची विक्री अधिकाधिक करण्याची आणि सणासुदीच्या हंगामानंतरही व्यवसायातील वाढ चालू ठेवण्याची संधी मिळेल.सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक दुकाने विक्रेत्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी Amazon वचनबद्ध

सणासुदीचा काळ हा महाराष्ट्रातील लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (SMBs) ई-कॉमर्सद्वारे त्यांचा ऑनलाइन व्यवसाय वाढविण्याची मोठी संधी आहे. यावेळी ग्राहकांच्या क्रयशक्तीत वाढ होण्याची क्षमता असते. या वर्षी राज्यातील 1,80,000 पेक्षा जास्त विक्रेते Amazon.in वर त्यांची उत्पादने सूचिबद्ध करतील आणि संपूर्ण भारतातील 100% सेवा पोहोचू शकणाऱ्या पिन कोडवर त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचतील. वाढती मागणी, ट्रॅफिक आणि विशेष सवलती यांचा लाभ घेऊन हे विक्रेते त्यांच्या विक्रीत वाढ करू शकतात व नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचू शकतात.

Amazon इंडियाच्या सेलिंग पार्टनर सर्व्हिसेसचे संचालक अमित नंदा म्हणाले, “Amazon मध्ये आम्ही महाराष्ट्रातील लघू आणि मध्यम उद्योगांना ई-कॉमर्सच्या फायद्यांचा लाभ घेण्यास मदत करून त्यांना सक्षम करण्यासाठी वचनबद्ध आहोत. दरवर्षी आम्ही सणासुदीच्या काळासाठी त्यांना चांगल्या उत्पादन सूची आणि निवडीद्वारे तयार करण्याकरिता विविध उपक्रम सादर करतो. त्यामुळे त्यांना त्यांच्या विक्रीत वाढ करण्यात मदत होऊ शकते. विक्री शुल्कात झालेली कपात, तसेच आम्ही सादर केलेले इतर उपाय आणि वैशिष्ट्ये विक्रेत्यांना सणासुदीच्या काळात व त्यानंतरही अभूतपूर्व यश मिळवून देतील, याची आम्हाला खात्री आहे.”

Amazon विक्रेत्यांना नोंदणी, सूचिबद्ध करणे आणि जाहिरात करणे, मागणीचा अंदाज लावणे, कॅटलॉगची गुणवत्ता सुधारणे व उत्पादन यादी बनविणे, तसेच डील्स आणि प्रोमोशन्स सादर करणे यांसारखे मुख्य कामकाज सुव्यवस्थित करण्यात मदत करण्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) व मशिन लर्निंग (ML)च्या सामर्थ्याचा लाभ करून घेत आहे.

अलीकडेच Amazon ने Rufus च्या बीटा व्हर्जनची सुरुवात केली आहे. हे एक जनरेटिव्ह AI आधारित शॉपिंग असिस्टंट आहे. ते Amazon च्या उत्पादन कॅटलॉगवर आणि वेबवरील माहितीवर प्रशिक्षित आहे. Rufus ग्राहकांच्या शॉपिंग गरजांवर, उत्पादनांवर आणि त्या संदर्भातील तुलनात्मक गोष्टींच्या प्रश्नांची उत्तरे देऊ शकतो. या संदर्भात शिफारसी देऊ शकतो आणि उत्पादनाचा शोध सुलभ करू शकतो. यामुळे ग्राहकांसाठी Amazon.in वर विक्रेत्यांकडून उत्पादने शोधणे, संशोधन करणे आणि खरेदी करणे सोपे होईल.

विक्रेत्यांना पाठबळ देण्यासाठी Amazon ने विक्री कार्यक्रम व्यवस्थापित आणि अंमलात आणण्याकरिता विक्रेत्यांना मदत करणारी सेल्स इव्हेंट प्लॅनरसारखी अनेक नवीन साधने आणि वैशिष्ट्ये, तसेच इमेजिंग सेवा आणि लिस्टिंग असिस्टंट यांसारखी AI प्रणित नावीन्यपूर्ण गोष्टी सादर केल्या आहेत. सेल्फ-सर्व्हिस रजिस्ट्रेशन (SSR 2.0) बहुभाषिक सुविधा आणि सुव्यवस्थित नोंदणी व इनव्हॉइसिंग प्रक्रियेसह ऑनबोर्डिंग सोपे करते. जोडीला सेल इव्हेंट प्लॅनर विक्रेत्यांना आकर्षक डील्स तयार करण्यात मदत करतो आणि प्रभावी इन्व्हेंटरी प्लॅनिंगसाठी मौल्यवान माहिती पुरवितो. New Seller Success Center  ऑनलाइन शॉप्स उभारण्यासाठी आणि Ads, Prime व डील्ससारख्या वैशिष्ट्यांचा वापर कसा करायचा, याविषयी तपशीलवार मार्गदर्शन करते. मल्टी-चॅनेल फुलफिलमेंट (MCF) विक्रेत्यांना Amazonच्या वितरण नेटवर्कचा वापर करून अधिक ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास सोपे करेल.

पायाभूत सुविधांमधील Amazon च्या गुंतवणुकीमुळे ग्राहकांना जलद आणि विश्वासार्ह वितरण अनुभव मिळणे क्य होत आहे.

गेल्या काही वर्षांत Amazon ने भारतभर आणि महाराष्ट्रात एक मजबूत प्रत्यक्षातील पायाभूत सुविधा तयार करण्यात गुंतवणूक केली आहे. आज महाराष्ट्रात Amazon चे 6 सॉर्टेशन सेंटर असून, सुमारे 200 Amazon च्या मालकीचे आणि पार्टनर डिलिव्हरी स्टेशन आहेत. ‘आय हॅव स्पेस’ स्टोअर्स 3,000 हून अधिक आहेत. पायाभूत सुविधांमधील या गुंतवणुकीमुळे महाराष्ट्रातील विक्रेत्यांना संपूर्ण भारतातील 100% सेवा पुरविता येऊ शकणाऱ्या  पिन कोड्सवर त्यांच्या ग्राहकांपर्यंत पोहोचण्यास मदत होत आहे, तसेच यामुळे राज्यात रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत.

About Amazon.in

The Amazon.in marketplace is operated by Amazon Seller Services Private Ltd, an affiliate of Amazon.com, Inc. (NASDAQ: AMZN). Amazon.in seeks to build the most customer-centric online destination for customers to find and discover virtually anything they want to buy online by giving them more of what they want – vast selection, competitive prices, fast and reliable delivery, and a trusted and convenient experience; and provide sellers with a world-class e-commerce marketplace.

For more information, visit amazon.in/aboutus

For news on Amazon, follow twitter.com/AmazonNews_IN

सणासुदीच्या काळात महाराष्ट्रातील स्थानिक दुकाने विक्रेत्यांच्या वाढीला चालना देण्यासाठी Amazon वचनबद्ध