Daily UpdatePune | NEWS

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का ! आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला

Share Post

पुणे लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना एक एका मागून एक धक्के बसत आहेत. काँग्रेसचे माजी उपमहापौर आबा बागुल यांना लोकसभेची उमेदवारी मिळाली नाही म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची भेट घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळे मविआच्या गोटात खळबळ उडाली आहे. पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का ! आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला

आबा बागुलांच्या या पवित्र्याने, आम्ही सर्व मिळून रवींद्र धंगेकरांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणू असे बोलणाऱ्या काँग्रेसच्या नेत्यांमध्ये अलबेल नसल्याचे समोर आले असल्याचे पहायला मिळत आहे.

आमदार रवींद्र धंगेकर हे कसब्याचे आमदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये मविआचे उमेदवार म्हणून विजयी झाले. त्यानंतर त्यांना पुणे लोकसभेचीही उमेदवारी देण्यात आली. मात्र, याला काँग्रेस पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून कोणी उघड तर कोणी छुपेपणाने विरोध पहिल्यापासून दर्शवला आहे. त्याची तीव्रता दिवसेंदिवस वाढतच असून धंगेकरांच्या समोर यामुळे मोठ्या समस्या निर्माण झाल्याचे पाहायला मिळत आहे.

काही दिवसांपूर्वी आबा बागुल यांनी आपली नाराजी पुणे काँग्रेस भवन येथील महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ निदर्शने करून दर्शवली होती. त्यानंतर काँग्रेस पक्षांतर्गत बैठकीला बागुल यांनी दांडी मारली होती. आता आबा बागुल यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्यासाठी नागपूर गाठल्याचे वृत्त समोर आले आहे.
आबा बागुल यांना मानणारा एक मोठा मतदार वर्ग आहे. आबा बागुलांनी त्यांच्या प्रभागामध्ये अनेक उपक्रम राबवलेले आहेत. ज्येष्ठांना काशी यात्रा आणि नवरात्र महोत्सव यामुळे त्यांचा नावलौकिक मतदारसंघात आहे.

पर्वतीच्या विद्यमान आमदार माधुरी मिसाळ तसेच भाजपचे लोकसभा निवडणूक समन्वयक श्रीनाथ भीमाले यांचीही ताकद मोठी आहे. त्यामुळे महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या मताधिक्क्यात आणखी वाढ होणार आहे.

पुण्यात काँग्रेसला मोठा धक्का! आबा बागुल फडणवीसांच्या भेटीला