चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प
महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांना कोथरूड विधानसभा मतदारसंघातून वाढते जनसमर्थन मिळत असून; आज एका ज्येष्ठ नागरिकाने कवितेच्या माध्यमातून विक्रमी मतांनी पाटील यांना विजयी करण्याचा संकल्प केला.चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प
विधानसभा निवडणूक प्रचार संपण्यास आता काही तासच उरले आहेत. कोथरूड विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार चंद्रकांतदादा पाटील यांची पाच वर्षांतील विकासकामे आणि सेवा उपक्रमांच्या बळावर विक्रमी मतांनी विजयी करण्याचा निर्धार कोथरुडमधील सर्व नागरिकांनी केला आहे. त्याचा प्रत्यय निवडणूक प्रचारामध्ये सातत्याने येत आहे.
आज चंद्रकांतदादा पाटील यांनी नवचैतन्य हास्य योग परिवाराच्या बाणेर शाखेच्या सराव शिबीरास सदिच्छा भेट दिली. यावेळी हास्य क्लबचे सदस्य दिपक पावसे यांनी कवितेच्या माध्यमातून शुभेच्छा देत; चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचे आवाहन केले.
यावेळी सागर बालवडकर, भाजपा नेते गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, प्रकाशतात्या बालवडकर, कल्याणी टोकेकर उपस्थित होते.
![चंद्रकांतदादांना विक्रमी मतांनी विजयी करण्याचा कवितेतून संकल्प](https://www.smartpunekarnews.com/wp-content/uploads/2024/11/Screenshot-2024-11-18-222147-1024x515.png)