Daily UpdateNEWS

आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल – DCM देवेंद्र फडणवीस

Share Post

देशाच्या लोकसभेमध्ये आढळराव पाटलांनी गेले पंधरा वर्ष अतिशय उत्तम काम केलं आहे. आपल्या मतदारसंघातील अनेक प्रश्न, मुद्दे आढळराव पाटलांनी उपस्थित केले आहेत. त्यांनी सातत्याने आपल्या भागाचा विकास व्हावा, यासाठी एक संघर्ष उभा केला आहे. त्यामुळे आता आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल, तेव्हा या भागाचा मोठ्या प्रमाणात विकास होईल, असा विश्वास आज राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. शिरूर लोकसभा महायुतीचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी पाच कंदील चौक, शिरूर येथे सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल – DCM देवेंद्र फडणवीस

पुढे बोलतांना देवेंद्र फडणवीस यांनी आढळराव पाटलांचं कौतूकही केलं. ते म्हणाले की, महेश दादा असो किंवा आढळराव पाटील असो. त्यांनी बैलगाडी शर्यतीसाठी खुप प्रयत्न केलेत. अडीच वर्ष महाविकास आघाडीचं सरकार होतं. त्यावेळी काहीचं झालं नाही. त्यानंतर मी मुख्यमंत्री असतांना तो प्रश्न मार्गी लावला. सरकार आलं आणि बैलगाडी शर्यंत सुरू केली. असं म्हणत शेतकऱ्यांना काय हवंय, सामान्य माणसाला काय हवंय हे जाणणारे आढळराव पाटील आहे. असेही फडणवीस म्हणाले.

जागावाटपात शिरूरची जागा राष्ट्रवादीच्या कोट्यात गेली. दुसऱ्या बाजूला एकनाथ शिंदेंच्या शिवसेने देखील आग्रह धरला. शेवटी मधला मार्ग मी काढला. जागा जरी राष्ट्रवादीला गेली तर उमेदवार म्हणून आपण आढळराव पाटलांना देऊ असं दोघांना सांगितलं. तिथे पक्ष बदलला नाही. आम्ही एका विचाराने सोबत आलो आहोत. याआधी पालघरमध्ये आम्ही ठाकरेंना उमेदवारही दिला आणि जागी ही दिला. त्यानंतर तो उमेदवार देखील आम्ही निवडून आणला. एका विचारात काम करत असतांना आम्ही पक्ष बदलला नाही. त्याठिकाणी आम्ही ठरवून केलं आहे. असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

पुढे देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांच्या चांगलाच समाचार घेतला. शिवाजीराव आढळराव पाटलांवर पक्ष बदलण्याचा आरोप केला जात आहे. परंतु विरोधकांकडून टिका होत असेल तर समोरच्या उमेदवारांनी किती पक्ष बदलला. किती निष्ठा जपली. गेल्या पाच वर्षात किती फेसबुक पोस्ट टाकल्या. अन् कुठे कुठे जाणार होते ? आता कसे थांबले. ? याचं सत्य जर आम्ही सांगायला लागलो तर त्यांचा खरा चेहरा आता उघड होईल. असा इशाराही त्यांनी दिला.

आढळरावांपेक्षा अमोल कोल्हे एका गोष्टीत ते सरस आहेत. आढळराव पाटील नाटककार नाहीत. त्यांना नाटक जमत नाहीत. त्यांना नाटक जमतं, रडता येतं. हसता येतं. बोलता येतं चुगलेबाजी करता येतं. असं म्हणत लोक नाटकाचं तिकीट घेऊन एकदा बघायला जातात. परंतु नाटक जर प्लॉप झालं तर लोक परत जात नाहीत. असा टोलाही देवेंद्र फडणवीस यांनी अमोल कोल्हे यांना लगावला.

दरम्यान, पाच वर्ष हा व्यक्ती मतदारसंघात फिरकला नाहीत. आता ते गावात जातात. त्यावेळी लोकं शिव्या वगैरे देत नाहीत. त्यांना बोलवतात. सत्कार करतात. हार घालतात. मग विचारतात पाच वर्षे कुठे होते ? ही निवडणूक देशाची असून आढळराव सारखा एक व्यक्ती मोदींसोबत ज्यावेळी जाईल. त्यावेळी आपल्या भागातील अनेक प्रश्न मार्गी लागतील.असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला.

आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल - DCM देवेंद्र फडणवीस
आढळरावांसारखा नेता मोदींसोबत केंद्रात जाईल – DCM देवेंद्र फडणवीस