राष्ट्रीय पुरस्कार विजेती पार्श्वगायिका सावनी रवींद्र हिने आजपर्यंत संगीत क्षेत्रात नवनवीन प्रयोग केले आहेत. तिच्या युट्यूब सिरीजमुळे सावनी नेहमीच चर्चेत...
Month: August 2022
'बॉईज', 'बॉईज २' आणि आता 'बॉईज ३' लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. मराठी ब्लॉकबस्टर 'बॉईज ३'चा म्युझिकल अल्बम चांगलाच चर्चेचा...
३४ व्या पुणे फेस्टिव्हलमधील ‘उगवते तारे’ व ‘इंद्रधनू’ यामध्ये यंदा ३०० हून अधिक बाल व युवाकलाकारांनी सहभाग घेतला आहे. मंगळवार ६ सप्टे. व बुधवार ७ सप्टे. या...
दरवर्षी प्रमाणे यंदाही ३४व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून क्रीडा क्षेत्राला प्रोत्साहन देण्याचे धोरण पुणे फेस्टिव्हलचे चेअरमन सुरेश...
महिला सबलीकरणाचे देशात सर्वत्र काम सुरु आहे. स्वर्गीय राजीव गांधी यांनी या कार्याची सुरुवात केली. महिला सबलीकरणाच्या दृष्टीने उपयुक्त ठरणार्या महिला बचटगटांची चळवळ देशभर सुरु आहे. देशात महिला बचतगट महाराष्ट्रात सर्वाधिक आहे ही कौतुकाची बाब आहे, असे मत माजी खासदार व कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते संजय निरुपम यांनी आज व्यक्त केले. महिलांना सक्षम करण्यासाठी बचतगटांचे कार्य अतुलनीय असून या कार्याला हातभार देण्यासाठी पुढे येण्याचे आवाहन त्यांनी यावेळी त्यांनी केले. पुणे शहर, जिल्हा काँग्रेस कमिटी, प्रियदर्शनी वुमेन्स फोरम व पायल तिवारी बिटीया फाऊंडेशनच्यावतीने काँग्रेसभवन प्रागंणात भरविण्यात आलेल्या ‘गौरी गणपती साहित्य जत्रे’चे उदघाटन माजी खासदार व ज्येष्ठ कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या हस्ते झाले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे, माजी आमदार उल्हासदादा पवार, जत्रा महोत्सवाच्या आयोजिका व महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा संगिता तिवारी, माजी आमदार दिप्ती चवधरी, देवमाणूस फेम अभिनेत्री प्रतिक्षा जाधव, अभिनेत्री आरती शिंदे, माजी नगरसेवक विरेंद्र किराड, बाळासाहेब दाभेकर, कमल व्यवहारे, सुजात शेट्टी, रफीक शेख, आदी पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निरुपम म्हणाले की, महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने विविध कौशल्य, कलाकुसरीचे व्यवसाय करुन महिलांनी स्वतःच्या पायावर उभे राहणे गरजेचे आहे. महिला बचतगटाचे काम ही संस्था पुढे नेत आहे. इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्र महिला बचतगटाच्या कामात अग्रेसर आहे. महिलाशक्ती ही संपुर्ण कुटूंबाला पुढे घेऊन जाते. तिवारी फाऊंडेशनने महिलांसाठी मोठे व्यासपीठ तयार करुन दिले असून महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम त्या करीत आहेत. याचे कौतुक निरुपम यांनी यावेळी केले. उल्हास पवार म्हणाले, महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी बचतगटाचे काम कौतुकास्पद आहे. गेली 13 वर्षे गौरी गणपती साहित्य जत्रा भरविण्यात येते. हे कार्य पुढे घेऊन जाण्यासाठी महिला पुढे येत आहेत. त्यांच्या सक्षमीकरणासाठी एकजुटीने काम करण्याची गरज असल्याचे यावेळी त्यांनी नमूद केले. अभिनेत्री आरती शिंदे म्हणाल्या, कोरोना काळात महिलांनी बचतगटांमार्फत आपल्या कुटूंबाला आर्थिक हातभार दिला. प्रत्येक महिलांनी आर्थिक सक्षम होण्यासाठी नवनवीन शिकणे गरजेचे आहे. अरविंद शिंदे म्हणाले, महिला बचतगटांना व्यासपीठ तयार करुन देणे कष्टाचे काम आहे. 13 वर्षे अविरतपणे हा उपक्रम सुरु असून महिलांना जोडण्याचे काम सुरु आहे. आयोजिका संगीता तिवारी यांनी प्रस्ताविक केले. गेली 13 वर्षांपासून ‘गौरी गणपती साहित्य जत्रा’ काँग्रेस भवन येथे भरविण्यात येते. महिलांचा उर्त्स्फूत प्रतिसाद मिळतो. यंदा 70 हून अधिक स्टॉल उभारण्यात आले आहेत. सर्व पूजेचे साहित्यासह “वाती ते मूर्ती” सर्वप्रकारचे साहित्य एकाच छताखाली मिळणार आहे. 30 सप्टेंबरपर्यंत सकाळी 10 ते रात्री 10 वाजेपर्यंत गौरी गणपती साहित्य जत्रा महोत्सव खुला असणार आहे. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन सुधीर गाडगीळ यांनी केले. तर सुवर्णा माने यांनी आभारप्रदर्शन केले. कार्यक्रमास मोठी गर्दी होती.
जन्म - मृत्यू अटळ सत्य आहे, आप्तस्वकीय, जिवलग जाण्याने मन अगदी सैरभैर होतं. अशा प्रसंगी कोणाचा तरी मदतीचा हात हवा...
झी स्टुडिओजने नेहमीच प्रेक्षकांना खूप उत्कृष्ट सिनेमे दिले. ‘पांडू’, 'टाईमपास ३', 'धर्मवीर' सारखे सुपरहिट सिनेमे दिल्यानंतर झी स्टुडिओज आता विनोदी...
पुणे, २५ ऑगस्ट २०२२: पुणे फॅशन वीक आणि पुण्यातील एशिया मॉडेल फेस्टिव्हलच्या संयुक्त विद्यमाने फेस ऑफ इंडिया त्याच्या नवीनतम आवृत्तीसह...
मागील चार दशकांपासून चित्रपट, मालिका, संगीत निर्मिती आणि वितरण क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंटने प्रेक्षकांचे नेहमीच विविध माध्यमांमधून मनोरंजन केले. प्रेक्षकांचे पारंपरिक माध्यमांतून मनोरंजन केल्यानंतर आता अल्ट्रा आणखी एका नवीन वाटचालीसाठी सज्ज झाले आहे. लवकरच अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट मराठी ओटीटी क्षेत्रात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने लोकप्रिय चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाणी असा मनोरंजनाचा खजिना प्रेक्षकांना दाखवण्याचा अल्ट्राचा मानस आहे. अल्ट्रा मीडिया ॲण्ड एन्टरटेन्मेंट प्रा. लि.चे एमडी आणि सीईओ सुशीलकुमार अग्रवाल म्हणतात, ''महाराष्ट्राला वैभवशाली संस्कृतीचा वारसा लाभला असून मुळात मला मराठी भाषेबद्दल खूप अभिमान आहे. ही संस्कृती चित्रपट, वेबसीरिज, नाटकं, गाण्यांच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा आमचा प्रयत्न आहे. मनोरंजन क्षेत्रात गेल्या काही वर्षांपासून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर होत आहे. अल्ट्राने नेहमीच काळानुसार बदलत जाणारे तंत्रज्ञान आत्मसात केले. ओटीटीची निर्मिती हा याचाच एक भाग आहे. या माध्यमातून आम्ही आमचा सर्वोत्तम आशय आमच्या प्रेक्षकांसाठी, जागतिक स्तरावर अधिक सहजरित्या उपलब्ध करू शकतो आणि त्यामुळे प्रेक्षकांनाही एकाच ठिकाणी मनोरंजनाचा आनंद घेता येईल.'' त्यामुळे आता लवकरच प्रेक्षकांना काहीतरी नवीन मनोरंजनात्मक पाहायला मिळणार, हे नक्की
जिओ स्टुडिओजने मराठी डिजिटल विश्वात ‘एका काळेचे मणी' ही एक धमाल वेबसिरीज आणली आहे. एका चित्र-विचित्र फॅमिली ची आगळी वेगळी...