Latest News

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड च्या पुणे शाखेच्या 2 विद्यार्थ्यानी JEE Advanced 2024 परीक्षेत मिळविले सर्वोत्तम गुण

Share Post

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड (AESL) च्या पुणे शाखेतील 2 विद्यार्थिनी विद्यार्थ्यांनी मानाच्या JEE Advanced 2024 परीक्षेत सर्वाधिक गुण मिळवून लक्षणीय यश संपादित केले आहे. या विद्यार्थ्यांचे हे यश म्हणजे त्यांचे कष्ट, निष्ठा आणि AESL मध्ये मिळणा-या उच्च दर्जाच्या मार्गदर्शनाला मिळालेली पावतीच आहे. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी मद्रास ने आज या परीक्षेचा निकाल प्रसिद्ध केला.आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड च्या पुणे शाखेच्या 2 विद्यार्थ्यानी JEE Advanced 2024 परीक्षेत मिळविले सर्वोत्तम गुण

स्वरा टकले हिला देशात 595 वा क्रमांक मिळाला तर अक्षत बाझल ने 983 वे स्थान पटकाविले.

या विद्यार्थ्यानी AESLच्या क्लास रूम तुकडीत मार्गदर्शन घेत जगातील अत्यंत अवघड प्रवेश परीक्षा मानली जाणा-या JEE Advanced 2024 परीक्षेची तयारी केली. त्यांनी आपल्या या यशाचे श्रेय अभ्यासतील विविध संकल्पना समजावून देण्यासाठी घेतलेले खडतर परिश्रम आणि अभ्यासाचे अत्यंत शिस्तबद्ध वेळापत्रक यांना दिले आहे. “या दोन्ही बाबतीत आकाश च्या शिक्षक वर्गाने आम्हाला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल आम्ही अत्यंत आभारी आहोत. आकाश ने तयार केलेले अभ्यासाचे साहित्य आणि AESL मध्ये मिळालेले मार्गदर्शन नसते तर इतक्या कमी वेळात विविध विषयातील अनेक संकल्पना नीट समजून घेणे शक्य नव्हते,” असे हे विद्यार्थी म्हणाले.

स्वरा आणि अक्षत यांच्या घवघवीत यशाबद्दल त्यांचे अभिनंदन करताना AESL चे अध्यापन प्रमुख आणि व्यवसाय प्रमुख श्री अमित सिंग राठोड म्हणाले, ” आमच्या या विद्यार्थ्यानी मिळविलेल्या या मोठ्या यशाबद्दल आम्ही त्यांचे अभिनंदन करतो. त्यांच्या अथक प्रयत्नांचे आणि निष्ठेचे तसेच त्यांना त्यांच्या पालकांनी तिला दिलेल्या भक्कम पाठबळाचे प्रतिबिंब त्यांच्या यशात दिसते. NEET च्या आमच्या सर्वच विद्यार्थ्यांना आम्ही भविष्यातील उत्तम यशासाठी शुभेछा देतो.”

JEE Advanced ही प्रवेश परीक्षा दरवर्षी JEE Mains परीक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी तर्फे आयोजित केली जाते. JEE Main ही परीक्षा देशातील विविध राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्थांमधील तसेच केंद्राचे अनुदान मिळणा-या अभियांत्रिकी महाविद्यालयांमधील प्रवेशासाठी असते तर JEE Advanced ही परीक्षा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी च्या प्रवेशासाठी एकमेव पात्रता परीक्षा आहे. मात्र JEE Advanced देण्यासाठी विद्यार्थ्यांना JEE Main मध्ये उत्तीर्ण व्हावे लागते.

या वर्षी 180,200 विद्यार्थ्यानी JEE (Advanced) 2024 च्या प्रश्नपत्रिका 1 and 2 सोडविल्या. एकंदर 48,248 विद्यार्थी JEE (Advanced) 2024 मध्ये पात्र ठरले आहेत.

आकाश तर्फे दहावी आणि बारावी पातळीवरच्या विद्यार्थ्यांची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी प्रवेश परीक्षेची सर्वांगीण तयारी करून घेतली जाते. अलीकडे आकाश ने संगणकाधारित शिक्षणावर भर दिला आहे. संस्थेच्या iTutor या पद्धतीद्वारे व्हिडिओ व्याख्याने सादर होतात ज्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या गतीने शिकता येते तसेच अभ्यासक्रमातील चुकलेला भाग मिळविता येतो. या खेरीज, प्रत्यक्ष परीक्षेच्याच धर्तीवर होणा-या सराव परीक्षा विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढवितात.

आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड च्या पुणे शाखेच्या 2 विद्यार्थ्यानी JEE Advanced 2024 परीक्षेत मिळविले सर्वोत्तम गुण
आकाश एज्युकेशनल सर्व्हिसेस लिमिटेड च्या पुणे शाखेच्या 2 विद्यार्थ्यानी JEE Advanced 2024 परीक्षेत मिळविले सर्वोत्तम गुण