NEWS

10 रुपायात इडली,माय इडली एक्सप्रेस च्या दहाव्या शाखेचे धानोरी येथे भव्य दिमाखदार उद्घाटन

Share Post

अल्पावधीतच लोकांच्या पसंतीला उतरलेले व आरोग्यदायी नाश्त्यासाठी ओळख निर्माण करणारे. तसेच इडली क्षेत्रामध्ये स्पेशलिटी असलेले माय इडली एक्सप्रेस या ब्रँडच्या दहाव्या शाखेचे नुकतेच उद्घाटन मोठया दिमाखात करण्यात आले. नऊ शाखांच्या यशानंतर दहावी शाखा धानोरी येथील विट्ठल मंदिरा शेजारी सुरू करण्यात आली .सर्वसामान्य लोंकाना परवडेल अश्या फक्त दहा रुपायत इडली सोबत चविष्ट सांबार आणि चटणी येथे मिळणार आह़े .या वेळी वडगाव शेरी विधानसभा मतदार संघाचे आमदार सुनीलआण्णा टिंगरे ,अभिनेते निनाद तांबडे ,मॉडेल रुजुता जोशी,मोनिका बंगाळ,दीप्ती सींग,यांच्या हस्ते माय इडली एक्सप्रेस च्या दहाव्या शाखेचे उद्घाटन रिबीन कट करून करण्यात आले .संजय सातव पाटील परिवाराने सुरू केलेल्या धानोरी विट्ठल मंदिर येथिल माय इडली एक्सप्रेसच्या शाखा उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार सुनील आण्णा टिंगरे,हवेली पंचायत समितीचे सभापती नारायण आव्हाळे,नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.विट्ठल सातव, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शशीआण्णा टिंगरे, सरपंच रामदास आव्हाळे, सोबतच माय इडली एक्सप्रेसचे संभाजी तांबे ,मयूर तांबे, आकाश तांबे,भावना तांबे, शेरल डेनिस, प्राजक्ता तांबे,महन्तेश कुंभार ,आयुष सातव ,आशिष सातव ,प्रकाश सातव ,चंद्रकांत सातव तसेच परिसरातील राजकीय, सामजिक, पत्रकार, विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती नातेवाईक व बाल गोपाळ मोठया संख्येने उपस्थित होते.तसेच मान्यवरांनी माय इडली एक्सप्रेस साठी शुभेच्छा दिल्या .यावेळी उद्घाटन प्रसंगी मोफत इडली वाटप करण्यात आली मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा लाभ घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *