महाराष्ट्रातील युवकांसाठी महाराष्ट्र व्हिजन फोरमचे व्यासपीठ उपलब्ध – आ. रोहित पवार
राजकीय आणि धोरण प्रक्रिये संदर्भातील युवा केंद्रित कार्यक्रम पत्रिका तयार करण्याचे व्यासपीठ राज्यातील युवकांना उपलब्ध झाले आहे.शाश्वत विकास साधण्यासाठी योग्य कार्यक्रमपत्रिका तयार करण्यासाठी महाराष्ट्र व्हिजन फोरमची स्थापना करण्यात आल्याची माहिती आमदार रोहित पवार यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत दिली. या माध्यमातून युवा आणि नागरिक ऑनलाईन पद्धतीने मतदान करून राज्यातील महत्त्वाच्या समस्या निश्चित करुन त्यावर उपाययोजना सुचवू शकणार आहेत.
मतदानाच्या माध्यमातून पुढं आलेल्या सर्वाधिक महत्त्वाच्या समस्यांवर आणि त्यावरील उपाययोजनांवर १ मे रोजी ‘व्हिजन डाक्युमेंट’ बनविण्यात येणार आहेत. #MVF मध्ये कला, महिला, विधी, ऊर्जा, कृषी, प्रशासन, अर्थकारण आदी विविध क्षेत्रात काम करणाऱ्या अनुभवी व्यक्ती मेंटॉर म्हणून काम करत आहेत. युवा, नागरिक आणि मेंटॉर या सर्वांच्या मदतीने तयार होणारं ‘व्हिजन डॉक्युमेंट’ हे राज्याच्या विकासाला दिशा देणारं सर्वाधिक पारदर्शक धोरण असेल.
हे धोरण राबवण्यासाठी सरकारला देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचा आग्रह धरण्यात येणार आहे.
अधिक माहितीसाठी – www.mahavisionforum.com ला भेट द्या.